'मला तुरुंगात टाकायचे असेल तर...': मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर साधला निशाणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नातेवाईंकाच्या ठिकाणांवर पडलेल्या छाप्यावरुन भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
Chief Minister Uddhav Thackeray
Chief Minister Uddhav ThackerayDainik Gomantak

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलंच गाजत आहे. याच पाश्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नातेवाईंकाच्या ठिकाणांवर पडलेल्या छाप्यावरुन भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री ठाकरे विधानसभेत म्हणाले, 'मला तुरुंगात टाकायचे असेल तर खुशाल टाका, परंतु कुटुंबीयांचा छळ करु नका. तुम्हाला सत्तेची हाव लागली आहे. चला, मला तुरुंगात टाका. सत्तेत यायचे असेल तर सत्तेत या, पण त्यासाठी खोटेपणा करु नका. माझ्या आणि इतर कोणाच्याही कुटुंबीयांना त्रास देऊ नका. आम्ही तुमच्या कुटुंबीयांना कधीही त्रास दिला नाही. आम्ही असे म्हणत नाही की, तुमच्या कुटुंबियांनी काही चूक केली आहे. घरच्यांना त्रास देऊ नका एवढंच मला सांगायचं आहे.'' (Chief Minister Uddhav Thackeray criticized BJP while speaking in the assembly)

दरम्यान, भावूक होत मुख्यमंत्री म्हणाले, ' तुम्हाला सत्तेत येण्यासाठी आम्हाला तुरुंगात टाकावे लागत असेल तर खुशाल टाका. तुम्ही लोक आमच्या कुटुंबीयांवरील चौकशीचे राजकारण करत आहात. हिम्मत असेल तर पुढे या.'

Chief Minister Uddhav Thackeray
आधी रामाच्या नावाने आणि आता दाऊदच्या नावाने मतं मागणार का? ठाकरे यांचे भाजपला प्रत्युत्तर

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 'इंदिरा गांधींनी (Indira Gandhi) आणीबाणी लादली असली तरी ती अघोषित आणीबाणी होती.' नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरील ईडीच्या कारवाईबाबतही मुख्यमंत्र्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. नवाब मलिक प्रकरणी मुख्यमंत्री म्हणाले, ''मी बदनामीला घाबरत नाही, पण बिनबुडाचे आरोप करुन राजीनामा मागू नका. नवाब मलिक दोषी आढळल्यास जी कारवाई करायची असेल ती करा.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com