मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेवर झालेली शस्त्रक्रिया यशस्वी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेचा आणि मणक्याचा त्रास सुरू झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेवर झालेली  शस्त्रक्रिया यशस्वी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेवर झालेली शस्त्रक्रिया यशस्वीDainik Gomantak

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना गेल्या आठवड्याभरापासून मानेचे दुखणे सुरू झाले होते. त्यांच्यावर काही दिवस घरीच उपचार केले गेले. त्यांना दोन दिवसापूर्वी एच. एन रिलायन्स दवाखान्यात दाखल करण्यात आले. आज सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर स्पाइन सर्जन डॉक्टर शेखर भोजराज यांनी शस्त्रक्रिया केली असून ती यशस्वी झाली आहे. ही तासभर शस्त्रक्रिया चालल्याची माहिती देखील यावेळी डॉक्टरांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या आठवड्यापासून हा त्रास होत होता. गेल्या सोमवारी तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजनचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. त्यात ते मानेला पट्टा लवाउण बसलेले दिसत होते. यामुळे त्यांना मानेचा त्रास असल्याचे स्पष्ट झाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com