कोरोनावरील लस पूर्णपणे सुरक्षित - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Copy of Gomantak Banner  (38).jpg
Copy of Gomantak Banner (38).jpg

पुणे : कोरोनाची लस तयार होत असलेल्या सिरम इन्स्टिट्युटच्या पुण्यातील इमारतीला काल आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घटनास्थळी भेट देऊन सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी केली. यानंतर सिरम इन्स्टिट्युट मध्ये निर्मिती होत असलेल्या कोरोना विरुद्धची लस सुरक्षित असून, या लसीच्या उत्पादनाला कोणताही फटका बसला नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच आग लागलेल्या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आहे. व चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळेस नमूद केले.      

पुण्यातील मांजरी येथील सिरम इन्स्टिट्युटच्या इमारतीला काल आग लागली होती. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी करत, दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. तसेच त्यांनी सिरम इन्स्ट्यिट्यूटच्या टिमशी देखील संवाद साधला. यावेळेस मुख्यमंत्र्यांसमवेत विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खा. गिरीश बापट, आ. चेतन तुपे, सिरमचे सीईओ आदर पुनावाला, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, मुख्यमंत्री यांचे प्रमुख सल्लागार अजोय मेहता, आरोग्य सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.

या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत, कोरोनाचा हैदोस अद्यापही संपलेला नसल्याचे सांगितले. मात्र  गेल्या आठवडयातच सिरमच्या लसीमुळे आशेचा किरण निर्माण झाला असताना, अचानक आगीची बातमी आली. व या दुर्दैवी घटनेत पाच कामगार मृत्यूमुखी पडले. त्यामुळे घटनेची वार्ता समजताच तातडीने संपर्क करून याबाबतची माहिती घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाय या घटनेमुळे लस उत्पादन केंद्रालाच आग लागली तर पुढे कसे होणार अशी सर्वांनाच भीती होती. मात्र कोविडची लस जिथे बनवली जाते, ते केंद्र अंतरावर आहे आणि सिरमची कोरोना लस सुरक्षित असल्याचे  उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर सांगितले. तसेच आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी ती पूर्ण होवून अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल. व मृत्यू झालेल्या कुटुंबाची जबाबदारी सिरम कंपनीने घेतली आहे. मात्र काही आवश्यकता असेल तर शासन निश्चित मदत करेल, असे त्यांनी उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले.

सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ आदर पुनावाला यांनी यावेळेस कोरोना लसीच्या पुरवठयावर कोणताही परिणाम होणार असल्याचे पुन्हा एकदा नमूद केले. तसेच या अपघातात बीसीजी आणि इतर लसीचे नुकसान झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. व कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा सुरळीत राहणार असून लसीवर परिणाम नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठे असल्याचे त्यांनी स्पष्ट यावेळी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com