मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता जनतेशी संवाद साधणार

गोम्तक वृत्तसेवा
रविवार, 20 डिसेंबर 2020

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. दुपारी 1 वाजता ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री नागरिकांना संबोधित करतील.

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. दुपारी 1 वाजता ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री नागरिकांना संबोधित करतील. महाराष्ट्रातील कोरोनाच्या रूग्णांमध्ये पुन्हा वाढ असल्याने 'ख्रिसमस' आणि 'न्यू ईयर'चे स्वागत करताना घ्यावयाची काळजी याबाबत संवाद साधण्याची शक्याता आहे. या पार्श्वभूमीवर काही नवी नियमावली जाहीर होऊ शकते.

काल महाराष्ट्रात दिवसबरात 74 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर 3 हजार 940 नव्या रुग्णांची नोंद झाली. 3 हजार 119 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्यांचा संख्या नव्या रूग्णांपेक्षा कमी असल्याने महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पुन्हा गंभीर होण्याची भीती आहे.

 

संबंधित बातम्या