इंडियन बोटीवर 'चिनी' एआयएस सिस्टीम; सिंधुदुर्ग प्रशासन झालं खडबडून जागं

ज्या विभागाकडून (Department)यांना परवाना देण्यात आला आहे त्यांनीच या बीटीवर कारवाई केली पाहिजे. स्थानिक मच्छिमार (Fisherman)नेत्यांकडून अशी मागणी करण्यात आली आहे.
बेकायदेशीर मासेमारी करत असलेली बोट
बेकायदेशीर मासेमारी करत असलेली बोटDanik Gomantak

सिंधुदुर्ग: देवगड तटरक्षक दलातील रडारवर बसवण्यात आलेली रत्नागिरीतील Ratnagiri मच्छीमारी बोटीवर Boat चिनी कंपनीने AIS आयडेंटिफिकेशन सिस्टीम यंत्रणा बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे. या दोन बोटीवर सागरी सुरक्षा पोलीस Police आणि मत्स्य विभागाकडून संयुक्तपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आचरा आणि कुणकेश्वर या भागातील समुद्रात या बोटींची मच्छिमारी Fishing सुरु होती.

तीन बोटी समुद्रात मासेमारी करत असताना देवगड तटरक्षक दलाल त्या दिसून आल्या. तसेच कुणकेश्वर समुद्रामध्ये या तीन बोटीवर सिग्नल फ्रिक्वेन्सी दिसून आल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. यानंतर तात्काळ एका बोटीचे AIS यंत्रणा बंद करण्यात आली. त्यामुळे ती बोट प्रशासनाला सापडू शकली नाही. मात्र तिथे असलेल्या दोन बोटी सागरी सुरक्षा पोलीस आणि मत्स्य विभागाने यांनी त्या ताब्यात घेतल्या.

बेकायदेशीर मासेमारी करत असलेली बोट
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर माशांचा खच...

येथील स्थानिक मच्छिमार नेत्यांनी या बोटीवर गंभीर आरोप करत असे म्हटले आहे की, ही बोट अनधिकृत आहे. तसेच यांनी ट्रॉलरचा (trawler)परवाना घेतला आहे. हा परवाना घेतला असल्याने पर्ससीन फिशिंग यांना करता येणार नाही. त्यामुळे या बोटी अनधिकृत आहेत. या बोटीवर AIS यंत्रणा बसवल्या आहेत त्याही चायनाच्या आहेत. तसेच या कमी वाव मधुन यांची मासेमारी सुरु होती. त्यामुळे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. ज्या विभागाकडून यांना परवाना देण्यात आला आहे त्यांनीच या बीटीवर कारवाई केली पाहिजे. स्थानिक मच्छिमार नेत्यांकडून अशी मागणी करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com