आता मुंबई-कोकण प्रवास करा विमानाने; चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख ठरली

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

केंद्र सरकारने चिपी येथील विमानतळावरून विमानोड्डाणास परवानगी दिली आहे. तसेच, चिपी विमानतळावर सोमवारी विमान लॅंडिंगच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या.

ओरोस (सिंधुदुर्ग) :  पेडणे तालुक्यातील मोप येथील प्रस्तावित हरित विमानतळाचे काम अद्याप सुरू आहे. परंतु, केंद्र सरकारने चिपी येथील विमानतळावरून विमानोड्डाणास परवानगी दिली आहे. तसेच, चिपी विमानतळावर सोमवारी विमान लॅंडिंगच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या. या दोन्ही चाचाण्या यशस्वी झाल्याने विमानतळ सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीखदेखील निश्चित करण्यात आली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेत विनायक राऊत यांनी नारायण राणेंनी शिवसेनेवर केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला.

मोदी सरकारचा सेलिब्रेटिंवर टि्वटसाठी दबाव? राज्य सरकार करणार चौकशी

विमान वाहतूकीशी संबंधित दोन कंपन्यांकडून चिपी विमानतळावर लॅंडिंगच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या. चिपी विमानतळाचे उद्घटव 1 मार्चला पार पडणार आहे. चिपी विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी दररोज दुपारी 1:50  वाजता विमान सुटेल. यासाठी प्राथमिक तिकिटाची किंमत ही सुरूवातीला अडीच हजार रुपये इतकी असणार आहे. तर, मुंबईहून चिपीला जाण्यासाठी सकाळी 11 वाजता विमानाची सोय असणार आहे. या विमानसेवेमुळे मुंबई-कोकण प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर होणार आहे. अनेक कंपन्या येथे विमानसेवा तसेच इतर निगडीत कामांसाठी येण्यास इच्छुक असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

"अंबानी अदानींच्या सरकारापेक्षा गरिबांचे सरकार केव्हाही परवडेल"

केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेंतर्गत कोरोना यायच्या आधी 688 वैध मार्गांना मंजुरी दिली होती. त्यापैकी 281 मार्गांचा प्रत्यक्ष वापर सुरू झाला आहे. सरकारने 25 मे पासून देशांतर्गत विमान उड्डाणांना परवानगी दिली आहे. सरकारने उड्डाण 4.0 च्या पहिल्या टप्प्यात 78 नवीन मार्गांना मंजुरी दिली आहे. यात सिंधुदुर्गातील चिपी येथील विमानतळाचा समावेश आहे. महाराष्ट्रातील अमरावती, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अकोला, चंद्रपूर, दारणा कॅम्प, देवळाली, धुळे, गोंदिया, जत, कराड, कवळपूर, कुडाळ, लातूर, लोणावळा अॅम्बी व्हॅली, उस्मानाबाद, फलटण, शिरपूर, वाळूज यांचा समावेश आहे. उड्डाण योजनेंतर्गत राज्यातील नांदेड-हैदराबाद, मुंबई-कांडला, पोरबंदर-मुंबई, मुंबई-नांदेड, नांदेड-मुंबई, ओझर-दिल्ली, नागपूर-अलाहाबाद, कोल्हापूर- हैदराबाद, कोल्हापूर-बेंगळुरु, नाशिक-हैदराबाद, मुंबई-अलाहाबाद, कोल्हापूर-तिरुपती, जळगाव-अहमदाबाद, पुणे-अलाहाबाद, मुंबई-बेळगाव, मुंबई-दुर्गापूर, मुंबई- कोल्हापूर, मुंबई-जळगाव, नाशिक-पुणे या मार्गांना पूर्वीच उड्डाण-1, उड्डाण-2 आणि उड्डाण-3 मध्ये मंजुरी देण्यात आल्‍याची माहिती लेखी उत्तरात दिली आहे.

 

 

 

संबंधित बातम्या