Maharashtraच्या राजकारणात नवा ट्विस्ट, मुख्यमंत्र्यांनी घेतली मिलिंद नार्वेकरांची भेट

CM Eknath Shinde & Milind Narvekar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी पोहोचले.
CM Eknath Shinde & Milind Narvekar
CM Eknath Shinde & Milind NarvekarDainik Gomantak

Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी पोहोचले. गणेशाची पूजा करण्यासाठी नार्वेकर यांच्या निवासस्थानी गेल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. परंतु नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचे अनेक अर्थ लावले जात आहेत. नार्वेकर उद्धव ठाकरे यांचे निकवर्तीय मानले जातात.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी जूनमध्ये शिवसेना नेतृत्वाविरुद्ध बंड केले होते, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युतीचे सरकार कोसळले होते. जूनमध्ये एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे बंडखोर आमदार सुरतला गेले असता, मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) त्यांच्याशी बोलण्यासाठी तिथे पोहोचले होते. आता शिवसेनेच्या नेतृत्वावरुन एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात कायदेशीर लढाई सुरु आहे.

CM Eknath Shinde & Milind Narvekar
Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये मिलिंद नार्वेकर गणपतीच्या मूर्तीसमोर हात जोडून उभे आहेत. तर दुसऱ्या फोटोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मिलिंक नार्वेकर यांच्याशी बोलताना दिसत आहे. फोटो शेअर करताना सीएम शिंदे यांनी लिहिले की, 'मिलिंद नार्वेकर यांच्या घरी पोहोचलो आणि श्री गणेशाचे भक्तीपूर्वक दर्शन घेतले.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com