महाराष्ट्रातील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून होणार सुरु

महाराष्ट्रात कोरोनाचं सावट कमी झालं असताना ठाकरे सरकार एक एक क्षेत्रे खुली करत आहे. मागील काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारने राज्यातील शाळा सुरु केल्या होत्या.
महाराष्ट्रातील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून होणार सुरु
Uday SamantDainik Gomantak

महाराष्ट्रात कोरोनाचं सावट कमी झालं असताना ठाकरे सरकार एक एक क्षेत्रे खुली करत आहे. मागील काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारने राज्यातील शाळा सुरु केल्या होत्या. २० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरु होणार असल्याची माहिती राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मात्र कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले असावेत अशी अटही टाकण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील जिल्ह्यांमधील कोरोनाची स्थिती पाहता कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Uday Samant
जरा भान राखून काम करा, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी भरला दम

यावेळी बोलताना राज्याचे उच्च शिक्षणमंत्री म्हणाले, येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यामधील महाविद्यालये सुरु होणार आहेत. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे विद्यार्थ्यांना आवश्यक असणार आहे. याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, राज्यातील कॉलेज सुरु करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक नियमावली असणार आहे. राज्यातील त्या त्या जिल्ह्यामधील परिस्थिती पाहता निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही किंवा एकच डोस झालेला आहे, त्यांच्यासाठी विशेष कोरोना लसीकरणाची मोहीमन राबविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.