Nana Patole: महाराष्ट्रात आई आणि गोव्यात गेले की कापून खाई... गोमांसावरून पटोलेंची भाजपवर टीका

काळ्या टोपीच्या राज्यपालांनी केलेल्या महापुरूषांच्या अपमानावर भाजपने बोलावे
Nana patole
Nana patoleDainik Gomantak

Nana Patole on BJP: भाजप विदर्भात कमजोर असून काँग्रेस सगळीकडे एक नंबर आहे. विदर्भ हा काँग्रेसच्याच बाजूने आहे. जनतेच्याही मनात भाजपबद्दल शल्य आहे, अशी टीका महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

गोमांसाबाबत भाजपचे धोरण दुटप्पी असल्याचे सांगत त्यांनी भाजपवाले गाईला गोमाता म्हणतात. पण तिच्याबाबत महाराष्ट्रात आई आणि गोव्यात गेले कापून खाई, असे भाजपचे धोरण असल्याची खरमरीत टीका पटोले यांनी केली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Nana patole
Mumbai Session Court : “वेश्या व्यवसाय गुन्हा नाही, पण…” सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

नाना पटोले यांनी विविध मुद्यांवरून भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, काळ्या टोपीचा जो माणून महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून बसवला होता, त्यांनी महाराजांचा जो अपमान केला, त्याचे उत्तर भाजपने द्यावे.

राहुल गांधी मशाल घेऊन छत्रपतींचा विचार पेरत आहेत. पण, महापुरुषांचा अपमान होत होता, त्यावेळी भाजपवाले कुठे होते?

भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांशी देणेघेणे नाही. महाराजांचे स्मारक कुठे आहे? फालतू आश्वासने देणे भाजपने सोडावे. महाराष्ट्रात जातीय-धार्मिक दंगली घडविण्याचा जो प्रकार दिसून येत आहे त्यात पोलिस बघ्याची भूमिका का घेत आहेत?

महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. पण भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे. महाराष्ट्रात ED चे सरकार आहे. राज्यात महापुरुषांचा अपमान होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे? असा प्रश्न पडतो, असेही पटोले म्हणाले.

पटोले म्हणाले की, कर्नाटक निवडणुकीतील यशानंतर लोकांमध्ये काँग्रेसबाबत विश्वास निर्माण झाला आहे. लोकांसाठी काम करणारा पक्ष अशी काँग्रेसची ओळख बनली आहे. दिल्लीत महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काय रणनीती असेल यावर चर्चा झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com