"अंबानी अदानींच्या सरकारापेक्षा गरिबांचे सरकार केव्हाही परवडेल"

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्र राज्यात निवडणुक होत असतांना शिवसेनेसोबत युती असताना उध्दव ठाकरे यांनी निवडणूकीच्या काळात प्रचाराच्या बॅनरवर नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटो लावून प्रचार केला होता.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्ही मुख्यमंत्री पदासाठी शब्द दिला नव्हता, असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले. त्यांच्या मते हे निवडणूकिसाठीचे आश्वासन होते. अमित शहा 130 कोटी जनतेला फसवू शकतात, तर त्यांना उद्धव ठाकरे यांना फसविले यात काही आश्चर्य नाही, अशी खोचक टिका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

महाराष्ट्र राज्यात निवडणुक होत असतांना शिवसेनेसोबत युती असताना उध्दव ठाकरे यांनी निवडणूकीच्या काळात प्रचाराच्या बॅनरवर नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटो लावून प्रचार केला होता. "महाराष्ट्र मुख्यमंत्रीपदावर मी कुठलीही चर्चा केली नव्हती. शिवसेनेला बंद दाराआड कोणतेही वचन दिले नाही. मी कधीही बंद खोलीत राजकारण केले नाही. मात्र सत्तेसाठी शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना मूठमाती दिली आहे. स्वार्थासाठी ते सत्तेत आले आहेत," असे गृहमंत्री अमित शहा काल सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आले असतांना बोलत होते. त्यावर सचिन सावंत यांनी असा खोचक टोमणा मारला आहे. 

गोव्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सचिन सावंत पुढे म्हणाले, "आमचं सरकार तीन चाकी रिक्षा आहे हे आम्ही पहिल्यापासून मान्य करतो. गरिबांचे तीन चाकी रिक्षा हे वाहन आहे.  अंबानी अदानींचे सरकार बनन्यापेक्षा गरिबांचं सरकार केव्हाही परवडेल. पण भाजप पक्ष या तीन चाकी रिक्षाच्या पुढे अनेक खड्डे खोदत आहे. सहकार क्षेत्रामध्ये भाजप पक्षाचे काय काम आहे हे आश्चर्यकारक आहे. काँग्रेस ने हे सहकार उभारले आहे.  फडणवीस सरकारच्या काळात या सहकारी संस्थांना कशा प्रकारे त्रास दिला हे आपण पाहिले आहे. अनेक कायदे कसे बदलले हेही पाहिले आहे. याबाबत सौ चुहे खाके बिल्ली हज को चली गयी असे म्हणावे लागेल,''

एलपीजी सिलिंडरची किंमत वाढणार; सबसिडी बंद करण्यासाठी सरकारच्या उपाययोजना -

अर्थमंत्री निर्मला सीतारामण काल मुंबईमध्ये होत्या. त्यांच्या कालच्या वक्तव्यांबद्दल बोलताना सावंत म्हणाले, "देश विकायला काढल्याचा हा प्रकार आहे आपल्या बाप दाज्यांची कमाई विकण्याचे काम कर्तव्य शून्य पिढी करत असते तसेच मोदी सरकार करत आहे. निवडक उद्योजकांच्या फायद्यासाठी या वर्षीचा अर्थसंकल्प मांडला आहे. निर्मला सीतारमण खोटे बोलतात. पेट्रोल वरती एक्साईज ड्युटी मुळे 20 लाख कोटींपेक्षा जास्त निधी मोदी सरकारने गोळा केला आहे. आपकी बार सौ पार अशी परिस्थिती आहे. गेल्या सहा वर्षापासून ही लूट सुरू आहे. हा खोटारडेपणाचा कळस आहे,"

 

संबंधित बातम्या