Sawantwadi: धावत्या कंटेनरमधून मुला-मुलींचा आवाज आला; लोकांना वाटले मानवी तस्करी, पण...

एक बंदिस्त कंटेनर सांवतवाडीतून जात असताना त्यातून मुला-मुलींचा मोठा आवाज आला. त्यावेळी रस्त्यावर असलेल्या लोकांना हे प्रकरण मानवी तस्करीचे असल्याची शंका आली.
Sawantwadi News
Sawantwadi News Dainik Gomantak

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथून एक वेगळीच घटना समोर आली आहे. या घटनेत गैरसमज झाल्यामुळे लोकांनी पोलिसांना पाचारण केले, पोलिसांनी पडताळणी करून शाहनिशा केली असता, सर्व प्रकरणच वेगळं असल्याचे निष्पन्न झाले.

एक बंदिस्त कंटेनर सांवतवाडीतून जात असताना त्यातून मुला-मुलींचा मोठा आवाज आला. त्यावेळी रस्त्यावर असलेल्या लोकांना हे प्रकरण मानवी तस्करीचे असल्याची शंका आली. त्यातून कोणीतरी थेट सावंतवाडी पोलिसांना संपर्क करून घटनेची माहिती दिली.

Sawantwadi News
MPSC Recruitment 2023: लागा तयारीला! एमपीएससीच्या 8,169 पदासाठी जाहिरात निघाली

झाले असे की, एका लग्नात जेवण वाढण्यासाठी संबधित मुला-मुलींना बोलाविण्यात आले होते. एका ठिकाणी पार्टी झाल्यानंतर आज दुसर्‍या ठिकाणी पार्टीसाठी ते जात होते. वाहतुकीसाठी वाहन नसल्याने कंटेनर मधूनच त्यांना नेले जात होते.

दरम्यान, सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मळगाव बाजारपेठेतून जात असताना या कंटेनर मधून आरडाओरडा ऐकू आला. लोकांना शंका आल्याने त्यांनी कंटेनर रोखला. त्यात मुली- मुले असल्याने त्यांचा संशय बळावला व पोलिसांना संपर्क करण्यात आला.

पोलिसांनी चौकशी कंटेनरसह सर्वांना पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी चौकशी केली असता सर्वजण कॅटरिंगच्या माध्यमातून जेवण वाढण्यासाठी आले असल्याची माहिती मिळाली.

Sawantwadi News
PM Modi Mumbai Visit: 'मुंबई देश की धडकन...', PM मोदींची मुंबईकरांना भावनिक साद

दरम्यान, सावंतवाडीचे पोलिस निरिक्षक मेंगडे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली आहे. "मुला-मुलींसह सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी केली ते सर्वजण कॅटरिंगसाठी आली असल्याचे निष्पन्न झाले. सर्वांची कागदपत्रे तापासण्यात आल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली."

"एका ठिकाणचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ही लोकं दुसऱ्या ठिकाणी जात होते. वाहतुकीसाठी साधन नसल्याने त्यांनी कंटेनरमधून जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, बंदिस्त कंटेनरमध्ये श्वास कोंडल्याने मुला-मुलांनी आरडाओरडा केला." असे मेंगडे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com