महाराष्ट्रात प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला एका रुग्णाचा मृत्यू!

दैनिक गोमंतक
सोमवार, 19 एप्रिल 2021

ऑक्सिजनचा, इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्या  महाराष्ट्रात परिस्थिती अधिकच गंभीर होत चालल्याचे दिसते आहे. 

कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत जाताना दिसते आहे. या परिस्थितीमध्ये देशातल्या आरोग्ययंत्रणा देखील अपुऱ्या पडताना दिसत आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, पंजाब सारख्या काही राज्यांना लॉकडाऊन सारखे निर्णय घ्यावे लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली असल्याचे समजते आहे. ऑक्सिजनचा, इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्या  महाराष्ट्रात मात्र परिस्थिती अधिकच गंभीर होत चालल्याचे दिसते आहे. (Corona deaths have increased in Maharashtra.)

देशात कोरोना रुग्णांच्या वाढीचे प्रमाण दिवसागणिक वाढताना दिसते आहे. अनेक राज्यांत परिस्थिती बिकट होत  चालली असून, स्मशानात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्णांचा  घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. त्यावरून कोरोना संक्रमणाची ही दुसरी लाट अत्यंत भयंकर रूप धारण करत असल्याचे पाहायला मिळते आहे. ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. त्यामुळेच राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढते आहे. काल राज्यात 24 तासात 68,631नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर  एकाच दिवसात तब्बल 500 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समजते आहे. आकडेवारीच्या अनुशंघाने राज्यात प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला एका जणाचा मृत्यू  होत असल्याचे समोर आले आहे.  

चिंतेची बाब ही आहे कि, राज्यात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी अनेक दिवसांपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सुरुवातीला नाईट कर्फ्यू त्यानंतर विकेंड लॉकडाऊन आणि आता 15 दिवसांसाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले असताना देखील रुग्णवाढीचा वेग कमी होताना दिसत नाही. सर्वच स्तरांतून याबद्दल चिंता व्यक्त केली जात असताना डॉक्टर तात्याराव लहाने यांनी 'लॉकडाऊन लागू केल्यानंतर रुग्णसंख्या कमी होण्यास किमान 7 दिवस लागतील' असे मत व्यक्त केले आहे.  

संबंधित बातम्या