महाराष्ट्रात या कारणांमुळे वाढला कोरोना; केंद्रीय पथकाचे राज्य सरकारला दिशानिर्देश

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 मार्च 2021

देशभरात कोरोनाचा प्रसार कमी होत असतानाच महाराष्ट्र राज्यात आणि मुंबईत कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असताना कोरोना रुग्णांचं रुग्ण प्रमाण अचानक झपाट्याने का वाढू लागलं?

मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रसार कमी होत असतानाच महाराष्ट्र राज्यात आणि मुंबईत कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असताना कोरोना रुग्णांचं रुग्ण प्रमाण अचानक झपाट्याने का वाढू लागलं? याची केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी केली. देशात कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. खासकरुन महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या महिन्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी चिन्हे दिसत होती मात्र कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा मागिल वर्षीसारखीच परिस्थिती का उद्भवत आहे, याची तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारने एक पथक पाठवले होते. 

1 आणि 2 मार्च रोजी केला होता दौरा

आणि महत्त्वाची बाब म्हणजे लोकलमधील वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे केंद्रीय पथकाने आपल्या अहवालात म्हटले आहे. या अहवालानंतर आरोग्य यंत्रणा देखील आता खुप गांभीर्याने काम करत नसल्याचे केंद्रीय पथकाने अहवालात नमूद केले आहे. हा कोरोना पाहणीचा दौरा  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव निपुण विनायक यांच्यासह तीन जणांच्या पथकाने 1 आणि 2 मार्च रोजी केला होता.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित 

या कारणांमुळे वाढला कोरोना

केंद्रीय पथकाच्या अहवालानुसार कोरोना संपला असे समजून लोकांचा वाढलेला निष्काळजीपणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लग्न, मोठे लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेल्या लोकसंख्येत वाढ आणि लोकलसह सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु करणे त्यात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण नसणे अशा काही गोष्टींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असे केंद्रीय पथकाने सांगितले आहे.

राज्य सरकारला दिशानिर्देश

महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ केली पाहिजे, नव्या रुग्णांचा शोध घ्यायला पाहिजे, कोरोना संबंधीच्या नियमांचे काटेकोरपण पालन करायला पाहिजे, अशा सूचना केंद्रीय पथकाने महाराष्ट्र सरकारला केल्या आहेत. काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर देणे आणि लसीकरण सुरू ठेवणे, असे उपायही या केंद्रीय पथकाने सुचवले आहे.

आख्खं महाराष्ट्र आता चाखेल हापूसची चव; रत्नागिरी विभागाची व्यावसायिक पद्धतीने तयारी 

संबंधित बातम्या