महाराष्ट्र कोरोना अपडेट: संक्रमित रूग्णांचे कोविड सेंटरच्या बाहेर धरणे

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 13 मार्च 2021

शेगाव येथे कोरोना संक्रमित रूग्णांंनी आंदोलन केले आहे. कोरोना-संक्रमित रुग्णांनी महाराष्ट्रातील शेगाव येथील कोविड केअर सेंटरच्या बाहेर निदर्शने करण्यास सुरवात केली.

बुलढाणा: राज्यात सगळीकडे कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोना रूग्ण संख्येत दिसागणीक वाढ होत आहे. अशातच शेगाव येथे कोरोना संक्रमित रूग्णांंनी आंदोलन केले आहे. कोरोना-संक्रमित रुग्णांनी महाराष्ट्रातील शेगाव येथील कोविड केअर सेंटरच्या बाहेर निदर्शने करण्यास सुरवात केली. त्यांनी दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांना भोजन मिळत नसल्याचा आरोप रूग्णांनी केला आणि त्यामुळे त्यानी केंद्राच्या आवारात येऊन निषेध करण्यास सुरूवात केली. 

बुलढाणा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी म्हणाले की, मला असे सांगितले गेले की सिलिंडरचे काम बंद झाले आहे, ज्यामुळे जेवण देण्यास उशीर झाला. अधिक माहितीसाठी ते या प्रकरणात व्यापक चौकशी करत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

 

 

संबंधित बातम्या