
Corona Update मागील काही काळात देशात कॉरोनचे थैमान सुरु असताना H3N2 व्हायरसमुळे लोकांच्या मनात पुन्हा एकदा धडकी भरली आहे.
सर्दी, ताप अशी या संसर्गजन्य आजाराची लक्षणे असून अद्याप यावर योग्य असे औषध उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. हे कमी कि काय म्हणून पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन दिवसांत 15 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात पुन्हा कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आरोग्य विभागाकडून पुन्हा एकदा कोरोना चाचण्या सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. यापूर्वीची अनुभव पाहता मार्च, एप्रिल व मे महिन्यातच कोरोनाची साथ अधिक तीव्र होती. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वी कोरोना उद्रेकाची ही चिन्हे तर नाहीत ना, असा प्रश्न यंत्रणेला पडला आहे.
कोरोना रुग्णांची टेस्ट
छत्रपती संभाजीनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महानगरपालिकेने प्रत्येक आरोग्य केंद्रावर आरटीपीसीआर आणि अँटिजेन टेस्टची सुविधा सुरु केली.
तर संशयित रुग्णांची टेस्ट करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली आहे. दोन-तीन दिवसांत केलेल्या अँटिजन आणि आरटीपीसीआर चाचण्यामधून 15 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.
यातील दोन रुग्ण ग्रामीण भागातील असून 13 रुग्ण शहराच्या विविध भागांतील आहेत.
तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत H3N2 व्हायरसचे 11 रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. मात्र कोणत्याही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा शहरातील आरोग्य परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.