कोरोनामुळे महाराष्ट्राच्या चिंतेत वाढ; सलग तिसर्‍या दिवशी 8 हजारांहून अधिक रूग्णांची नोंद

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती प्रकरणं राज्याची चिंता वाढवत आहे. झपाट्याने वाढत असलेल्या नवीन रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनदेखील जाहीर करण्यात आला आहे, परंतु शुक्रवारी सलग तिसर्‍या दिवशी महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाची आठ हजाराहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती प्रकरणं राज्याची चिंता वाढवत आहे. झपाट्याने वाढत असलेल्या नवीन रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनदेखील जाहीर करण्यात आला आहे, परंतु शुक्रवारी सलग तिसर्‍या दिवशी महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाची आठ हजाराहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. गेल्या 24 तासांत, कोरोनामुळे 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता एकूण कोरोना रूग्णांची संख्या 21,38,154 वर गेली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत 52,041 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना रूग्णांपैकी मुंबई, पुणे, नागपूर आणि अमरावतीमधील  40 टक्के रूग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत 20,17,303 लोक बरे झाले असून, 67,608 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

Lockdown : महाराष्ट्रातील अमरावती मध्ये लॉकडाउनचा मुक्काम वाढला; अत्यावश्यक सेवा राहणार सुरु

अनेक जिल्ह्यात संचारबंदी 

दरम्यान, राज्यातील अकोला जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये 8 मार्चपर्यंत 7 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्याशिवाय नागपूरमध्येदेखील सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग संस्था  7 मार्चपर्यंत बंद राहतील, तर या काळात प्रमुख बाजारपेठा शनिवार व रविवारी बंद राहतील. 25 फेब्रुवारी ते 7 मार्च या राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही. अमरावती जिल्ह्यात 22 फेब्रुवारीपासून एका आठवड्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय पुण्यातदेखील सकाळी 11 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदी असेल. तथापि, यावेळी जीवनावश्यक कामांना परवानगी असेल. जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत शाळा-महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात जर कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होत राहिली तर 12 तासांच्या नाईट कर्फ्यू लागू केला जाऊ शकतो, असं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं. 

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळाचे टर्मिनल 1 (T1) पुन्हा सुरू

1 मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या नियमांमध्ये बदल होणार 

दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाच्या नियमात बदल केला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, 1 मार्चपासून देशभरात लसीकरणाचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला जात आहे, ज्याद्वारे 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व आजराने ग्रस्त असलेल्या लोकांना लस देण्यात येणार आहे. 

संबंधित बातम्या