Corona Update : महाराष्ट्रात कोरोनाचा धुमाकुळ; रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 3 एप्रिल 2021

राज्यशासनाकडून निर्बंध अधिक कडक करुन सुध्दा कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे.

देशभरात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असूनही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यामध्ये कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे. दररोज मोठ्यासंख्येने कोरोनाबाधित आढळून येत असून रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत असताना दिसत आहे. याच पाश्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागु करण्याची चिन्हे दिसत आहेत.

राज्यशासनाकडून निर्बंध अधिक कडक करुन सुध्दा कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. आज दिवसभरामध्ये 49447 कोरोनाबाधित वाढले असून 277 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात मृत्यू दर 1.88 टक्के आहे. राज्यात आत्तापर्यंत 55655 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात आज रोजी एकूण 4,01,172 अक्टिव्ह रुग्ण आहेत. (Corona is rampant in Maharashtra)

लॉकडाऊन हा उपाय नाही, मात्र... उद्धव ठाकरेंचा सूचक इशारा

दरम्यान आज दिवसभरामध्ये 37821 रुग्ण ठिक देखील झाले आहेत. तसेच राज्यात आत्तापर्यंत एकूण 24,95315 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरीदेखील गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.49 एवढा झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्य़ा 2,03,43,123  प्रयोगशाळा नमुन्यापैकी 29,53,523 नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यामध्ये 21,57,135 व्यक्ती होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. 18994 व्य़क्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

 

संबंधित बातम्या