Corona Second Wave: दिलासादायक! महाराष्ट्र कोरोनातून सावरतोय..

Corona Second Wave: दिलासादायक! महाराष्ट्र कोरोनातून सावरतोय..
Corona Virus In Maharashtra

देशात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट थैमान घालत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयानक असेल असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले होतो. देशातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल महाराष्ट्र राज्य सध्या कोरोनातून सावरताना दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून ऑक्सिजन(Oxygen), रेमडीसीवीर(Remdesivir), बेड्स यामुळे लोक चिंतेत होते. परंतू आता काही प्रमाणात वितरण सुरळीत झाल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या अंशतः लॉकडाऊन(Lockdown) आहे. 1 मे पर्यंत लॉकडॉन असेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. त्यामुळे केलेल्या उपाययोजनांना आता यश येताना दिसत आहे. (Corona Second Wave: Maharashtra is recovering from Corona ..)

मागच्या सहा दिवसातील आकडेवारी  
मागच्या सहा दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. एका बाजूला रुग्ण वाढत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये लसीकरण मोहीम सुरु आहे. 1 एप्रिल पासून 18 वर्षावरील लोकांना लस मिळणार आहे. 
20 एप्रिल- 62,097
21 एप्रिल- 67,498
22 एप्रिल- 67,013
24 एप्रिल- 67,160
25 एप्रिल- 66,191 
26 एप्रिल- 48,700

काल महाराष्ट्रामध्ये 17,491 रुग्ण कमी झाले आहेत. त्यामुळे, रुग्ण संख्या कमी होतीये याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर आरोग्य यंत्रणेवरील दाब कमी होण्यास मदत होणार आहे. दुसऱ्या लाटेचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यामध्ये काल 2,538 रुग्ण आढळले आहेत. पुण्यात 20 एप्रिल रोजी 5,138 रुग्ण आढळले होते. मुंबईमधील रुग्णसंख्याही (Mumbai Corona) कमी होताना दिसत आहे. 

कोरोनातून बरे होणारे रुग्ण वाढले
मागच्या सहा दिवसात महाराष्ट्रामध्ये 4 लाख 42 हजार 466 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काळ राज्यात 71 हजार 736 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यातील पुणे जिल्हातील सर्वाधिक म्हणजेच 13 हजार 674 रुग्ण आहेत. मुंबईमध्ये काल 3,876 रुग्ण आढळले तर 9150 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील रुग्ण डबल होण्याचा कालावधी 62 दिवसांवर गेला आहे. राज्यात सध्या 6 लाख 74 हजार 770 ऍक्टिव्ह रुग्ण (Active Patient) आहेत तर बरे होण्याचा दर 82.92 टक्के आहे. 

Related Stories

No stories found.