औरंगाबादेत संसर्ग वेगात, रुग्णसंख्या २९७ वर

Dainik Gomantak
मंगळवार, 5 मे 2020

शहरात रविवारी (ता. तीन) कोरोनाबाधितांची संख्या २८३ होती. त्यात सोमवारी (ता. चार) १४ रुग्णांची भर पडली.

औरंगाबाद

शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून सोमवारी (ता. चार) १४ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे आता बाधितांची संख्या २९७ झाली आहे. यात एक पत्रकार व त्याच्या आईचाही समावेश आहे.
शहरात रविवारी (ता. तीन) कोरोनाबाधितांची संख्या २८३ होती. त्यात सोमवारी (ता. चार) १४ रुग्णांची भर पडली. सोमवारी सकाळच्या सत्रात आठ व दुपारच्या सत्रात सहा रुग्णांचा कोविड-१९चा अहवाल पॉझिटिव्ह आला. सोमवारी सकाळच्या सत्रात आठजण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. पंचशील दरवाजा आणि किलेअर्क - १, सावित्रीनगर-चिकलठाणा - १, पुंडलिकनगर - २, नंदनवन कॉलनी - १, जयभीमनगर - ३ या परिसरातील हे रुग्ण आहेत.
दुपारच्या सत्रात सहा रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात संजयनगर, मुकुंदवाडी येथील ४, किलेअर्क येथील १ आणि हडको एन-११ येथील १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
 

कोरोना मीटर
उपचार घेत असलेले रुग्ण ः २६२
बरे झालेले रुग्ण ः २५
मृत्यू झालेले रुग्ण ः १०

 

संबंधित बातम्या