Corona Update 2021: कोरोनाला हलक्यात घेतल्यास पडणार तो महाराष्ट्रावर भारी; आरोग्य पथकाने दिला राज्य सरकारला इशारा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 11 मार्च 2021

 कोरोनाच्या वाढत्या प्रकरणाबाबत केंद्र सरकारने 'महाराष्ट्राविषयी मोठी चिंता व्यक्त केली आहे' या दरम्यान सरकारने लोकांना कोरोना विषाणूला हलक्यात नका घेवू असे आवाहन केले आहे.

मुंबई: कोरोनाच्या वाढत्या प्रकरणाबाबत केंद्र सरकारने 'महाराष्ट्राविषयी मोठी चिंता व्यक्त केली आहे' या दरम्यान सरकारने लोकांना कोरोना विषाणूला हलक्यात नका घेवू असे आवाहन केले आहे. महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्याबद्दल केंद्र सरकार चिंताग्रस्त आहे. जर देशाला कोरोना मुक्त करावयाचे असेल तर त्या विषाणूविरूद्ध सर्व प्रकारच्या सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आम्हाला महाराष्ट्राबद्दल फार काळजी आहे, ही फार गंभीर बाब आहे. कोरोना व्हायरस ला हलक्यात घेऊ नका आणि जर कोरोना मुक्त रहायचा असेल तर आपण कोरोना मार्गदर्शकतत्त्वांचे पालन केले पाहिजे. असे निती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी गुरुवारी सांगितले.

यामुळे कॅनडात झळकले पंतप्रधान मोदींचे होर्डिंग 

महाराष्ट्रात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ होण्याच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. त्याअंतर्गत नागपुरात 15 ते २१ मार्च दरम्यान कडक लॉकडाउन बंदोबस्त जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये भाज्या, फळांची दुकाने, दूध यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरू असल्याचे या घोषणेत म्हटले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असे संकेत दिले होते की राज्यात कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे राज्यातील अनेक भागात लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.

Corona Update 2021: कोरोना रूग्णांमध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ; नागपुरात पुन्हा कडक लॉकडाऊन 

आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या 24 तासांत देशात कोविड -19 चे 22,854 रुग्ण आढळले आहेत. या नवीन प्रकरणांमध्ये जास्तीत जास्त 13,659 प्रकरणे (देशातील एकूण प्रकरणांपैकी 60 टक्के) महाराष्ट्रातील आहेत. त्यानंतर केरळमध्ये (2,475) आणि पंजाबमध्ये (1,393) रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरियाणा या आठ राज्यांत नवीन प्रकरणे वाढत आहेत. सध्या भारतात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1,89,226 आहे. केरळमध्ये कोविड -19 मधील रुग्णांची संख्या जवळपास अर्ध्यावर गेली असून महाराष्ट्रात दुप्पट झाली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. 

Hand Wash Tips: सॅनिटायझरच्या वापरामुळे हात कोरडे आणि राठ झाले? फॉलो करा या टिप्स 

संबंधित बातम्या