Corona Update: कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्रही सज्ज; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार लसीकरण मोहिमेचा श्रीगणेशा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 16 जानेवारी 2021

महाराष्ट्रात देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील लसीकरण मोहिमेचा आज सकाळी ११.३० वाजता  श्रीगणेशा करणार आहेत. मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलामधील कोविड सुविधा केंद्रात होणार आहे.

मुंबई : जगभरात कोरोनाने  गेल्या वर्शभरापासून थैमान घातले आहे. पण या कोरोना विरूद्धच्या लढ्यात भारताचे आज महत्वपूर्ण पाऊल पुढे पडत आहे. पंतप्रधान मोदी आज भारतात जगातील सर्वात मोठा कोविड -19 लसीकरण कार्यक्रम सुरू करणार आहेत.

आजपासून देशासोबत राज्यातही कोरोना लसीकरणाला सुरवात होत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी १०. ३० मी. या लसीकरण मोहिमेचं उदघाटन करतील आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात लसीकरण मोहिमेला सुरवात होणार आहे. देशभराच्या चुलनेत मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहायला मिळाला असून आता मुंबई लसीकरणासाठी पूर्णत सज्ज झाल्याचम दिसून येत आहे. 

महाराष्ट्रात देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील लसीकरण मोहिमेचा आज सकाळी ११.३० वाजता  श्रीगणेशा करणार आहेत. मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलामधील कोविड सुविधा केंद्रात होणार आहे. मुंबईमधील एकूण 9 केंद्रांवरील ७२ बूथवर हे लसीकरण केले जाणार आहे. केंद्र सरकारने राज्यांना पाठवलेल्या नियमावलीनुसार लसीकरण होणार आहे. या नियमावलीत लसीकरणादरम्यान कोणत्या गोष्टी करायच्या  आणि कोणत्या नाही याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. 

लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमात  पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधणार आहे. दरम्यान आजपासून सुरु होणाऱ्या लसीकरणासाठी मुंबई कशी सज्ज आहे आपण जाणून घेऊया...

मुंबईतील एकूण नऊ रुग्णांलयांमध्ये लसीकरण केंद्रांवर ही लस दिली जाणार आहे. मुंबईतील नऊ केंद्रांवर लसीकरणासाठी एकूण ७२ बूथ असणार आहेत. या सर्व लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी पाच बूथसाठी एक डॉक्टर देखील असणार आहेत. एका बुथवर दोन शिफ्टमध्ये दोनशे आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यातील लसीकरणात लस दिली जाणार आहे. मुंबईत दररोज १४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची मुंबईतील आरोग्य विभागाची क्षमता आहे. 

महाराष्ट्रा राज्यास एकूण किती डोज मिळाले? 

 

 •   1] मुंबई : १ लाख ३९ हजार ५००
 •   2] पुणे : १ लाख १३ हजार 
 •   3] औरंगाबाद : ३४ हजार 
 •   4] बीड : १८ हजार 
 •   5]  बुलडाणा : १९ हजार 
 •   6] अमरावती : १७ हजार 
 •   7]  भंडारा: ९ हजार ५०० 
 •   8]  जळगाव : २४ हजार  
 •   9]  धुळे, नंदुरबार :प्रत्येकी १२ हजार ५०० डोस 
 •  10]  गडचिरोली : १२ हजार 
 •  11]  गोंदिया : १० हजार 
 •  12]  परभणी : ९ हजार 
 •  13]  नागपूर : ४२ हजार 
 •  14]  नाशिक : ४३ हजार 
 •  15]  अहमदनगर : ३९ हजार 
 •  16]  सांगली : ३२ हजार 
 •  17]  सातारा : ३० हजार 
 •  18]  कोल्हापूर : ३७ हजार 
 •  19]  रायगड : ९ हजार ५०० 
 •  20]  रत्नागिरी : १६ हजार 
 •  21]  सिंधुदुर्ग : १० हजार 
 •  22]  भंडारा : ९ हजार ५००
 •  23]  चंद्रपूर : २० हजार 
 •  24]  वाशीम : ६ हजार ५०० 
 •  25]  ठाणे : ७४ हजार 
 •  26]  पालघर : १९ हजार 
 •  27]  सोलापूर  : ३४ हजार 
 •  28]  जालना : १४ हजार 
 •  29]  उस्मानाबाद : १० हजार 
 •  30]  वर्धा : २० हजार ५००
 •  31]  यवतमाळ : १८ हजार 
 •  32]  लातूर : २१ हजार 

 

 

संबंधित बातम्या