Corona Update: महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा कहर या जिल्ह्यात 16 हॉटस्पॉट्स; 31 मार्च पर्यंत कडक लॉकडाउन जाहीर

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 मार्च 2021

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सातत्याने वाढत आहे. या विषाणूने पुन्हा एकदा मागील वर्षासारखा कहर करायला सुरवात केली आहे. राज्यामध्ये ता या विषाणूने फिरण्यास सुरुवात केली आहे. 

ठाणे: महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सातत्याने वाढत आहे. या विषाणूने पुन्हा एकदा मागील वर्षासारखा कहर करायला सुरवात केली आहे. राज्यामध्ये ता या विषाणूने फिरण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत अ‍ॅक्टिव्ह कोरोनाच्या नवीन प्रकरणांची संख्या 89 टक्क्यांनी वाढली आहे. हेच कारण आहे की आता मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात कडक लॉकडाउन जाहीर केले आहे  आणि तो वाढविला गेला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा लॉकडाउनचा कहर महाराष्ट्रातील बऱ्याच शहरांमध्ये परत आला आहे. 

मुंबईतील ठाणे येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केला आहे आणि त्यामुळे ठाण्यात 16 हॉटस्पॉट्स असलेल्या ठिकाणी ताळेबंद लागू करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ठाणे शहरातील 16 हॉटस्पॉट्सवर 13 मार्च ते 31 मार्च दरम्यान लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत या भागातील कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

लॉकडाउन पूर्वीप्रमाणेच लागू होईल 

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेत असे सांगितले गेले आहे की, लॉकडाउन पूर्वीप्रमाणे लागू केल्याप्रमाणेच राहील. ठाण्यात कोविड 19 च्या नव्या 780 प्रकरणामुळे संक्रमित लोकांची संख्या 2,69,845 पर्यंत वाढल्याचे निदर्शनास आले आहे. संसर्गामुळे आणखी तीन लोकांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात मृतांचा आकडा 6,302 वर पोहचला आहे. जिल्ह्यातील कोविड 19 च्या कारणाने मृत्यूचे प्रमाण 2.34 टक्के असल्याची माहिती त्यांनी दिली.

रुग्णांची संख्या मुंबईत वाढली असून दररोज मागच्यापेक्षा जास्त कोरोना प्रकरणं पुढे येत आहे. कोरोना वाढल्यामुळे मुंबईत सक्रीय केसेसची संख्या गेल्या महिन्याच्या तुलनेत सुमारे 89 टक्क्यांनी वाढली आहे. अंधेरी (पश्चिम), चेंबूर, गोवंडी यासह आठ नागरी वॉर्डांमध्ये सर्वाधिक कोरोना प्रकरणे नोंदविण्यात येत आहेत. 7 मार्च रोजी मुंबईत कोरोनाची 1360 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, तर 1020 लोकांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्याच वेळी 6 मार्च रोजी मुंबईतील सक्रिय प्रकरणांची संख्या 10,398 वर गेली आहे. जी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केवळ 5,500 होती. मुंबईत एकूण कोरोनाची प्रकरणे वाढून 3,34,583 वर गेली आहेत.

संबंधित बातम्या