शरद पवारांनी घेतली कोरोना लस

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 1 मार्च 2021

आज मुंबईतील जे.जे. रुग्णालयामध्ये कोरोनाची लस घेतली. आजपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.

मुंबई : देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस आरोग्य क्षेत्रातील सेवकांना देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तिसऱ्या टप्प्यात 45 ते 60 वर्षापर्यंत असणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. आणि आजपासून या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुंबईतील जे.जे रुग्णलयामध्ये कोरोनाची लस घेतली आहे. आज दुपारी शरद पवारांनी रुग्णालयामध्य़े जाऊन ही लस घेतली आहे.

‘’आज मुंबईतील जे.जे. रुग्णालयामध्ये कोरोनाची लस घेतली. आजपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. ही लस घेण्यास पात्र असणाऱ्या जेष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन कोरोना विरुध्दाच्य़ा लढ्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे.’’ असं शरद पवारांनी केले आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी सात वाजता दिल्लीमधील एम्स रुग्णालयामध्ये तिसऱ्य़ा टप्प्य़ातील कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. ‘’एम्स रुग्णालयामध्ये कोरोनाचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलदगतीने काम केलं ते कौतुकास्पद आहे,’’ असं नरेंद्र मोदी म्हटलं आहे. 

 

 

संबंधित बातम्या