गणेश विसर्जन: किनाऱ्यांवर भक्तांना प्रवेश नाहीच

पोलिसांनी विनाकारण मांडवीत फिरणाऱ्यांना हटकल्याने नागरिकांमधून हुज्जत घातल्याचा प्रकार घडला. मात्र या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने (District Administration)विसर्जनासाठी नवी नियमावली जाहीर केली.
गणेश विसर्जन: किनाऱ्यांवर भक्तांना प्रवेश नाहीच
mandvi beach ratnagiriDainik Gomantak

रत्नागिरी: गणेश बाप्पाच्या विसर्जनाला मांडवी आणि भाट्ये (Mandvi and Bhatye)या किनारी दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. कोरोनामुळे या गर्दीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मंगळवार 14 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबर रोजी मांडवी व भाट्ये किनाऱ्यावर फक्त आणि फक्त गणपती मूर्ती ज्यांच्यासोबत असेल अश्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. गणेश विसर्जनाशिवाय अन्य कोणालाही किनाऱ्यांवर प्रवेश दिला जाणार नाही, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

रत्नागिरीत (Ratnagiri)गौरी-गणपती विसर्जन सोहळा हा मोठ्या प्रमाणावर असतो. अनंत चतुदर्शीला मांडवी आणि भाट्ये येथील किनाऱ्यावर गणपती मूर्ती विसर्जनाची संख्या मोठी असते. या भागात विसर्जन पाहण्यासाठी गणेश भक्त मोठ्या संख्येने या किनाऱ्यांवर गर्दी करीत असतात.

आताच झालेल्या दीड दिवसाच्या विसर्जनावेळी या किनारी गणेश चाहत्यांची मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले.

mandvi beach ratnagiri
Maharashtra: 'नारळाच्या पानांपासून' बनविली 31 फूट उंच पर्यावरणपूरक गणेश मूर्ती

यानंतर पोलिसांनी विनाकारण मांडवीत फिरणाऱ्यांना हटकल्याने नागरिकांमधून हुज्जत घातल्याचा प्रकार घडला. मात्र या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने विसर्जनासाठी नवी नियमावली जाहीर केली. यामध्ये मांडवी व भाट्ये या दोन्ही किनाऱ्यावर बाप्पाची मूर्ती नसेल तर तिथे जाण्यास 14 व 19 सप्टेंबर रोजी मनाईच आदेश दिला आहे.

विसर्जनासाठी लावण्यात आलेली कलमे(Act):

14 व 19 सप्टेंबर दिवशी बाप्पाचे विसर्जनच्या ठिकाणी बाप्पाची मुर्ती असेल तरच तेथे येणाऱ्या नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. भाट्ये व मांडवी या किनारपट्टीवर गणपती विसर्जनाशिवाय अन्य कोणत्याही कारणासाठी प्रवेश दिला जाणार नाही. यासाठी महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police)अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (4), 43 नुसार मनाईचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मुंबई पोलीस(Mumbai Police) अधिनियम 1951 चे कलम 37 (4) नुसार–पोट–कलम (1) अन्वये हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com