"सेलिब्रिटींमुळे देश चालत नाही"; संजय राऊतांचा टोला

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

''भारतीय सेलिब्रेटींना  केंद्रातील भाजप  सरकारने  एका  लक्झरी बसमध्ये बसवून  टिकरी, सिंघू, गाझीपूर सीमेवर घेवून गेले पाहिजे.

मुंबई : गेल्या तीन महिंन्यापासून  दिल्लीच्या  सीमेवर आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने बनवलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांकडून विरोध अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्य़ात आहे. भारतातील  शेतकरी आंदोलनावर परदेशातील अनेक सेलिब्रेटी  या अंदोलनावर आपल्या भूमिका मांडत आहेत. रिहाना, ग्रेटा थ्रेनबर्ग, मीना हॅरिस यांनी  शेतकरी आंदोलनाच्य़ा समर्थनार्थ ट्विट केली. लगेच भारतीय सेलिब्रिटींनी भारत सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केली आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय सेलिब्रेटींवर निशाणा साधला आहे. आधी भारतीय शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा  प्रयत्न करा, आणि त्यानंतर आपल्या  भूमिका  स्पष्ट  करा असा सूचक सल्ला  संजय  राऊतांनी  दिला आहे.

Farmer Protest: शेतकरी आंदोलनावर अमेरिकेने दिला भारताला 'हा' सल्ला
ते पुढे म्हणाले, ‘’भारतीय सेलिब्रेटींच्या जीवावर कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन चालत नाही. उन, वारा, पावसाचा सामना  करत  शेतकरी  दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत. भारतीय सेलिब्रेटींनी आपल्या संवेदना आपल्या तमाम  शेतकऱ्यांच्या  बाबतीत दाखवल्या का असा प्रश्न यावेळी संजय राऊतांनी विचारला.

शेतकरी आंदोलनासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

''भारतीय सेलिब्रेटींना  केंद्रातील भाजप  सरकारने  एका  लक्झरी बसमध्ये बसवून  टिकरी, सिंघू, गाझीपूर सीमेवर घेवून गेले पाहिजे. त्यानंतर गेल्य़ा तीन महिन्यांपासून शेतकरी कोणत्या परिस्थितीत कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी बसले आहेत हे त्यांना समजेल. गेल्या  काही  दिवसांपासून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काही मोजक्या सेलिब्रेटींनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून न घेता  काही भारतीय  सेलिब्रेटी आपल्या भूमिका मांडत आहेत हे शोकदायक आहेत. जगभरातील अनेक लोक शेतकरी आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी पुढे येत आहेत मात्र आपले सेलिब्रेटी भिती आणि दहशतीखाली आहेत.''

''काल मी  शेतकरी आंदोलनाचे प्रमुख नेते राकेश  टिकैत यांची भेट घेवून शेतकरी आंदोलनाची सध्या परिस्थिती काय आहे. दिवसेंदिवस शेतकरी आंदोलन वाढत चालले आहे. आता जे सेलिब्रेटी आपल्या भूमिका मांडण्यासाठी पुढे  येत आहेत. त्यांनी जाणून घेतले पाहीजे की या सेलिब्रेटींना शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय लोकांनी यांना खर तर सेलिब्रेटी बनवलं आहे. त्यांना काही  आताच्या राज्यकार्त्यांनी बनवलेले नाही.’’ असही शिवसेना खासदार संजय राऊत  म्हणाले.

संबंधित बातम्या