Adar Poonawalla z+ Security: अदर पूनावाला यांच्या झेड प्लस सुरक्षेच्या याचिकेवर विचार करा

Adar Poonawalla
Adar Poonawalla

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकार आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे सीईओ(CEO) अदर पूनावाला(adar poonawalla) यांना देण्यात आलेल्या सुरक्षेचा आढावा घेण्यास सांगितले आणि झेड-प्लस(Z+) सुरक्षा मागणार्‍या याचिकाकर्त्याच्या वकिलाच्या विनंतीवरही विचार करण्याचे निर्देश दिले. मुंबई हायकोर्टाने मंगळवारी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया चे सीईओ अदार पूनावालाला यांना कथित धमकी दिल्यानंतर आवश्यक सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले पाहिजे. पूनावाला कंपनीने तयार केलेल्या कोविशिल्ट लस पुरविल्याबद्दल त्यांना धमकी देण्यात आल्याची माहिती आहे.(The court asked the Maharashtra government to pay attention to the safety of Adar Poonawalla)

न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाने सांगितले की कोविड-19 लस देऊन पूनावाला मोठ्या प्रमाणात देशाची सेवा करीत आहेत आणि राज्य सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांनी त्यांच्या सुरक्षेची दखल घ्यावी. खंडपीठाने म्हटले आहे की राज्यातील उच्च अधिकाऱ्यांनी पूनावाला यांच्याशी वैयक्तिकरित्या बोलावे आणि भारतात परत आल्यानंतर त्यांना सुरक्षेची हमी द्यावी. ते नुकतेच लंडनला गेले होते.

अधिवक्ता वकील दत्ता माने यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालय सुनावणी देत होते. या याचिकेत पूनावाला यांच्या झेड प्लस सुरक्षेची विनंती केली आहे. पुण्याच्या उद्योजकांना केंद्र सरकारने यापूर्वी वाय(Y)-वर्ग सुरक्षा पुरविली आहे. याचिकाकर्त्याने आपले वकील प्रदीप हवनूर यांच्यामार्फत कोर्टाला सांगितले की,  वृत्तानुसार लसींच्या अती पुरवठ्याबाबत राजकारणी आणि काहींच्या सतत दबावामुळे पूनावाला भीती बाळगून जगत आहे. 

याच धमकीमुळे पुनावाला लंडनला गेले असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारचे वकील दीपक ठाकरे यांनी मंगळवारी कोर्टाला सांगितले की, राज्याने पूनवाला यांना वाय-श्रेणी सुरक्षा पुरविली आहे, त्याअंतर्गत राज्य पोलिसांचे सशस्त्र कर्मचारी आणि काही सीआरपीएफ जवान त्यांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास उपलब्ध असतील.

ते पुढे म्हणाले की, राज्य परिस्थितीचा आढावा घेत आहे आणि ते परत आल्यावर त्यांना झेड + सुरक्षा देण्याबाबत विचार करेल. यासंदर्भात खंडपीठाने असे म्हटले आहे की, राज्य सरकारने ही याचिका स्वत: च्या विरोधात घेऊ नये. पूनावाला एक उत्कृष्ट काम करत आहे. ते देशासाटी एक महान सेवा करीत आहे, पूनावाला आता लस उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com