आर्यन खानची आजची रात्र कोठडीतच, NCB करणार चौकशी
आर्यन खानDainik Gomantak

आर्यन खानची आजची रात्र कोठडीतच, NCB करणार चौकशी

या पार्टीतील छाप्यांदरम्यान NCB ने बेकायदेशीर ड्रग्स जप्त केली आहेत. यासह 10 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

NCB ने रविवारी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह तीन जणांना मुंबईच्या ऑफशोर एरियाच्या क्रूझ जहाजातून ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी अटक केली आहे. यानंतर, NCB ने आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांची मुंबईच्या फोर्ट कोर्टासमोर हजार केले होते आणि आता न्यायालयाने तिन्ही आरोपींना एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. आर्यनचे वकील सतीश मानशिंदे यांनी सोमवारी न्यायालयात जामीन अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

NCB ने आरोपींना 2 दिवस म्हणजे 5 ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यांनी न्यायालयाला सांगितले की त्यांना पुढील तपास करायचा आहे जेणेकरून कोठडी देण्यात यावी. NCB कडून हजर असलेले सरकारी वकील अद्वैत सेठना म्हणाले की, आम्हाला ड्रग सप्लायर आणि पेडलर्सचे लिंक्स शोधाव्या लागतील आणि आम्हाला काही व्हॉट्सअॅप चॅट्स देखील सापडल्या आहेत.तर दुसरीकडे आर्यनचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले की, आर्यनला पार्टी आयोजकांनी आमंत्रित केले होते. बोर्डिंगच्या वेळी आर्यनसोबत काहीही सापडले नाही.

आर्यन खान
आर्यन खानला NCB कडून अटक

आर्यन खानविरोधात एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांखाली प्रतिबंधित पदार्थ बाळगणे आणि सेवन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्यन खान आणि इतर सात जणांना शनिवारी रात्री एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर त्याला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शनिवारी रात्री मुंबईत कॉर्डेला द इम्प्रेस नावाच्या क्रूझवर अचानक छापा टाकला होता . या पार्टीतील छाप्यांदरम्यान एनसीबीने बेकायदेशीर ड्रग्स जप्त केली आहेत. यासह 10 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com