Covid19:आषाढी वारी यंदाही लाल परीतूनच

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 11 जून 2021

मंत्रीमंडळाच्या बैठकीत वारी संदर्भात चर्चा झाली असून महत्त्वाच्या 10 पालख्यांनाच वारीची परवानगी देण्यात येणार आहे.

राज्यात कोरोनाचे (Covid19) सावट असताना यंदाही ज्ञानोबा-तुकारामाचा गजर 'लाल' परीतून ऐकायला मिळणार आहे.  काल झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत यंदाही आषाढी वारी एसटीतूनच जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आसल्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी आज पुण्यात (pune) स्पष्ट केले आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत वारी संदर्भात चर्चा झाली असून महत्त्वाच्या 10 पालख्यांनाच वारीची परवानगी देण्यात येणार आहे. पालखीच्या प्रस्थान सोहळ्यावेळी देहू, आळंदीत (alandi)  फक्त 100 वारकऱ्यांना उपस्थितीत राहण्याची परवानगी असेल. तसेच उरलेल्या 8 पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 50 वारकऱ्यांना परवानगी देण्यात येणार आहे, असेही पवारांनी सांगितले. (Covid19 Ashadhi Wari is still in the red Bus)

सिंधुदुर्ग किल्याच्या पाऊलखुणा; कसा मिळवला पेडणे महालावर पोर्तुगीजांनी ताबा 

पुण्यामध्ये आज झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते.  ते म्हणाले, काल (गुरुवारी) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दहा महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी देण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी वैद्यकीय चाचणी (medical aunt) करणे आवश्यक असणार आहे. प्रत्येक बसमध्ये कोरोना नियमांचे पालन करुन फक्त ३० वारकऱ्यांनाच परवानगी असेल. बस वाखरीला पोहोचल्यावर तेथून पंढरपूरपर्यंत (Pandharpur) पायी वरी करण्यात येईल. रिंगण व रथोत्सवाच्या सोहळ्याला १५ वारकऱ्यांनाच परवानगी असेल.

 या पालख्यांच्या प्रस्थानाला १०० वारकऱ्यांना परवानगी 

  •  संत निवृत्ती महाराज ( त्र्येंबकेश्वर )
  •  संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )
  •  संत सोपान काका महाराज ( सासवड )
  •  संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )
  • संत तुकाराम महाराज ( देहू )
  •  संत नामदेव महाराज ( पंढरपूर )
  •  संत एकनाथ महाराज ( पैठण )
  •  रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )
  • संत निळोबाराय पिंपळनेर - पारनेर अहमदनगर )
  •  संत चांगटेश्वर महाराज ( सासवड )

संबंधित बातम्या