Crime News: 25 लाखांसाठी मित्रांनी अल्पवयीन मुलाचे अपहरण करून केली हत्या

मीरा रोड येथे 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी 14 वर्षीय मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Crime
CrimeDainik Gomantak

मीरा रोड (Maharashtra) येथे 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी 14 वर्षीय मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काशिमिरा पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटकेत घेतले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Crime News A minor was kidnapped and killed by friends for 25 lakhs)

Crime
Attack On Uday Samant: शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्यावर पुण्यात हल्ला

मिरा रोड येथील शांतीपार्क परिसरात हिना नहार सिंग ही महिला अजय आणि मयांक सिंग या दोन मुलांसह वास्तव्य करते. ती बोरीवलीच्या एका बारमध्ये गायिकेचे काम करते. रविवारी रात्री त्या नेहमीप्रमाणे कामावर गेल्या आणि रात्री 12 च्या सुमारास तिचा मुलगा मयांक हा घरातून बेपत्ता झाला होता. तसेच याप्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मंगळवारी दुपारी मयांकचा मृतदेह वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापडला. चाकूने भोसकून त्या मुलाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी काशिमिरा पोलिसांनी अफझल अन्सारी आणि इम्रान शेख या दोन आरोपींना पोलिसांनी अटकेत घेतले आहे. आरोपी हे मयत मुलाचे मित्र असल्याचे समोर येत आहेत.

Crime
Maharashtra: साडेचार लाखात नवजात बाळाचा सौदा करणाऱ्या दोन महिला गजाआड

मयांकची आई बारबाला असल्याने तिच्याकडे भरपूर पैसे असतील असे आरोपींना वाटत होते मात्र पैशांच्या आमिषाने त्यांनी मयांकचे अपहरण करून खंडणीचा बनाव रचला होता. तर दरम्यान, मयांकला संशय आल्याने आरोपींनी त्याची हत्या केली आणि नंतर खंडणी मागितली, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी काशिमिरा पोलीस सखोल तपास करत असून त्यांनी नेमकी हत्या का केली? खंडणीसाठी केली की अन्य काही कारण होते? याचा तपास पोलीस सध्या करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com