लस वापराच्या निकषाबाबंत अद्याप स्पष्टता नाही

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

राज्यात कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात  358 आरोग्य केंद्रावर काम करत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

 मुंबई: देशात लसीकरणाचा कार्यक्रम 16 जानेवारीपासून सुरु होणार आहे.राज्याला कोरोनावरील 'कोवीशिल्ड' आणि कोव्हॅक्सीन या लसी प्राप्त झाल्या मात्र लस कोणाला द्यावी कोणाला नाही याबाबबत अद्याप तरी अस्पष्टता असून व नियमांवली जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.
राज्यात कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात  358 आरोग्य केंद्रावर काम करत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.मात्र ही लस सहव्याधी असल्यास किंवा औषधं चालू असल्यास द्यावी याबाबतचे निकष किंवा सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.तसेचं लसीच्या पहिल्या मात्रेनंतर दुसरी मात्रा कधी देण्यात यावी याची ही माहीती अद्याप मिळालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

येत्या दोन दिवसांत लसींच्या बाबतची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.परंतु ही माहिती नियमावली स्वरुपात आल्यास सगळया ठिकाणी योग्यरितीने पोहचविणे सोपे जाणार आसल्याचे आरोग्य आयुक्तालयातील तज्ञ वैज्ञकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.लसींचा वापर केल्यानंतर होणारा फायदा किंवा तोटा,लसींची सुरक्षितता त्याचबरोबरीने लसीकरणाची काय गरज. आहे.आरोग्य कर्मचारी,अधिकारी यांच्यामध्ये शंका आहेत.लसीकरणाच्या जागृतीवर लक्ष केंद्रीत करण्यावर भर देणं आवश्यक असल्याचं मुबंई महानगरपालिकेच्या विभागीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या