महाराष्ट्रातील यवतमाळ मध्ये संचारबंदीचा निर्णय;अत्यावश्यक सेवांना मुभा

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

कोरोनाचा प्रसार विदर्भातील अमरावती, य़वतमाळ, अकोला, नागपूर या शहरांमध्ये वाढू लागला आहे.

यवतमाळ: महाराष्टा्रात कोरोनाचा वाढता प्रसार नागरिकांची आणि सरकारची चिंता वाढवत आहे. राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. सुरुवातीला राज्यात कोरोनाचा प्रसार पुणे, मुंबई या शहरामध्य़े झपाट्य़ाने वाढला होता. आता कोरोनाचा प्रसार विदर्भातील अमरावती, य़वतमाळ, अकोला, नागपूर या शहरांमध्ये वाढू लागला आहे. याची दक्षता लक्षात घेवूनच  यवतमाळ जिल्ह्यात शनिवार सायंकाळी 5 पासून ते सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत  कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शहरात आवश्यक सेवा चालू राहणार आहेत.

महाराष्ट्रात वाढता कोरोनाचा प्रसार लक्षात घेता यवतमाळमद्ये कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचे केसेस वाढत आहेत. मागच्या 24 तासात राज्यात 8807 नवे कोरोना रुग्णांची नोद झाली आहे. तर केरळमध्ये 4106 पंजाब 558 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यृ झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. 138 केसेसमधील 80 मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत.

मार्च महिन्यात या तारखांना बंद राहणार महाराष्ट्रातील बॅंका

मुंबईमधील प्रसिध्द सिध्दीविनायकाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांना आता आगोदर ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. सिध्दीविनायक मंदीर ट्रस्टच्या मुख्य कार्याधीकारी प्रियंका छापवाले म्हणाल्या, ''पुढच्या महिन्यापासून सिध्दिविनायक मंदिराच्या दर्शनासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. आणि एकाच वेळी 100 देशभक्तांनाच दर्शन घेता येणार आहे.'' कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मंदिर गेलं काही महिने बंद होतं.

 

संबंधित बातम्या