दापोली न.पं.ची निवडणूक जाहीर झाली

राष्ट्रवादीने झालेल्या जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेससोबत (Congress) आघाडी मात्र केलीच नाही.
दापोली न.पं.ची निवडणूक जाहीर झाली
दापोली नगरपंचायतDainik Gomantak

दाभोळ: दापोली नगरपंचायतीची होणाऱ्या निवडणूका राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीसाठी आचारसंहिता कालपासून लागू करण्यात आली आहे. इतक्यात निवडणूका जाहीर होतील, अशी आशा राजकीय पक्ष व प्रशासनालाही नव्हती. त्यामुळे आता मात्र सर्वांची एकच धांदल उडालेली दिसून येते. दापोली नगरपंचायतीच्या 2016 च्या निवडणुकीमध्ये शिवसेना व भाजप यांनी स्वबळावर तर राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांनी आघाडी करून निवडणूक लढवल्या होत्या.

यामध्ये 7 जागांवर शिवसेना, 4 राष्ट्रवादी, 4 कॉंग्रेस व 2 भाजपा असे उमेदवार निवडून आले होते. त्यावेळी शिवसेना व भाजप यांची युती असल्याने शिवसेनेचे 7 व भाजपचे 2 सदस्य मिळून नगरपंचायतीमध्ये त्यांनी आपली सत्ता स्थापनेचा दावा शिवसेनेकडून भाजपकडे केला होता. मात्र भाजपने त्यास नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादी, कॉंग्रेस व भाजप यांनी एकत्र येऊन भाजपचा नगराध्यक्ष तर कॉंग्रेसला उपनगराध्यक्ष पद देऊन सेनेला मात्र सत्तेबाहेर ठेवले होते. तत्कालीन आमदार संजय कदम यांनी याबाबत घोषणा देखील केली होती. मात्र कॉंग्रेसला विश्वासात न घेता ही घोषणा केल्याने कॉंग्रेसकडून मात्र त्यास स्पष्ट नकार देण्यात आला.

दापोली नगरपंचायत
'गोव्यात आलेले राजकिय सायबेरीयन पक्षी निवडणूक संपल्यावर परत जाणार'

कॉंग्रेसने राष्ट्रवादीसोबतची आघाडी सोडून शिवसेनेसोबत करार केला. यानंतर राष्ट्रवादीने झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी मात्र केलीच नाही. आणि त्या निवडणुकीत कॉंग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

  • उमेदवारी अर्ज स्वीकारणे 1 ते 7 डिसेंबर 2021

  • उमेदवारी अर्जांची छाननी 8 डिसेंबर

  • अर्ज मागे घेण्याची अंतिम तारिख 13 डिसेंबर

  • मतदान 21 डिसेंबर

  • मतमोजणी 22 डिसेंबर

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com