डार्क नेटवरून तरुणांना गांजाविक्री

Dainik Gomantak
रविवार, 14 जून 2020

प्रसिद्ध मिठाईवाल्याच्या मुलासह दोघांना अटक

मुंबई

 डार्क नेटच्या माध्यमातून गांजा मागवून महाविद्यालयीन तरुणांना विक्री करणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यापैकी एक आरोपी प्रसिद्ध मिठाईवाल्याचा मुलगा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
फैज शकील भिवंडीवाला (31) व आरिफ उस्मान मिठाईवाला (22) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वांद्रे टर्नर रोड येथे गांजा घेण्यासाठी दोघे जण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेतील कक्ष-9 चे सहायक पोलिस निरीक्षक सुधीर जाधव यांना मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने टर्नर रोड येथे सापळा रचून दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्या तपासणीत 224 ग्रॅम गांजा सापडला. आरोपींच्या चौकशीतून "टॉर' व "विकर मी' या संकेतस्थळांवरून डार्क नेटच्या माध्यमातून गांजा मागवल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत साडेपाच लाख रुपये आहे. आरिफ उस्मान मिठाईवाला हा आरोपी एका प्रसिद्ध मिष्टान्न भांडाराच्या मालकाचा मुलगा आहे.

संबंधित बातम्या