धक्कादायक! कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेताच भिवंडीतील व्यक्तीचा मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 3 मार्च 2021

महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मुंबई :  महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मंगळवारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर सुखदेव किर्दत यांचा मृत्यू झाला. आरोग्यसेवक म्हणून त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस 28 जानेवारी रोजी घेतला होता. सध्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की मृत्यूचे खरे कारण समजू शकलेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कारण स्पष्ट होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मृत सुखदेव किर्दत हे भिवंडीचे रहिवासी होते. 

Corona Virus : हरियाणात कोरोनाचा उच्छाद; 78 जणांना कोरोनानं ओढळं जाळ्यात

15 मिनिटे बेशुद्ध होते

दुसरा डोस घेतल्यानंतर ते सुमारे 15 मिनिटे निरीक्षण कक्षात बेशुद्ध अवस्थेत होते. त्यानंतर त्यांना जवळच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथेच त्यांचा मृत्यू झाला. कीर्दत एका डोळ्यांच्या डॉक्टरकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होते. 28 जानेवारी रोजी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला होता. रुग्णालयात उपस्थित डॉक्टर खरात म्हणाले, ''त्यांनी महिन्याभरापूर्वी पहिला डोस घेतला आणि त्यावेळी त्यांना कोणताही त्रास झाला नव्हता. डोस देण्यापूर्वी पूर्ण चेकअप करण्यात आलं होतं. बऱ्याच वर्षांपासून त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास होता. परंतु, डोस घेण्यापूर्वी त्यांचं बीपी व ऑक्सीजन नॉर्मल होतं."

बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळींनी तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप; आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल

मृत्यू नेमका कशामुळे झाला हे सांगणं कठीण आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच याबद्दल सविस्तर बोलता येईल, असं ते म्हणाले. देशभरात लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात 60 वर्षांवरील व गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना लस दिली जात आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात आली. मंगळवारी महाराष्ट्रात 33 हजार 44 लोकांना लस देण्यात आली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी लस घेणाऱ्यांच्या संख्या वाढ झाली आहे. 

संबंधित बातम्या