Mumbai: मुंबईत दिल्ली पोलिसांना मोठे यश, 1725 कोटींचे ड्रग्ज केले जप्त

Heroin Seized In Mumbai: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुंबईतील जवाहरलाल नेहरु बंदरातून कंटेनरमध्ये पॅक केलेले हेरॉइनची मोठी खेप जप्त केली आहे.
Heroin
Heroin Dainik Gomantak

Delhi Narco Terror: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुंबईतील जवाहरलाल नेहरु बंदरातून कंटेनरमध्ये पॅक केलेली हेरॉइनची मोठी खेप जप्त केली आहे. या 345 किलो हेरॉईनची किंमत 1725 कोटी रुपये आहे. 6 सप्टेंबर रोजी दिल्लीतील कालिंदी कुंज परिसरातून अटक करण्यात आलेल्या दोन अफगाण नागरिकांकडून ही माहिती मिळाली.

दरम्यान, स्पेशल सेलचे विशेष आयुक्त एचजीएस धालीवाल यांनी सांगितले की, 'हेरॉईनची ही खेप 21 जून 2021 पासून मुंबईतील जवाहरलाल नेहरु बंदरात उभ्या असलेल्या कंटेनरमध्ये होती. गेल्या शुक्रवारी म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी हे ड्रग्ज मुंबईतून (Mumbai) जप्त करण्यात आले.'

Heroin
Mumbai Suicide: मुंबईत दररोज 4 जण करतायेत आत्महत्या, तरुणांचा आकडा सर्वाधिक

पाकिस्तान-अफगाणिस्तान कनेक्शन

विशेष आयुक्त एचजीएस धालीवाल यांनी दावा केला की, 'ही खेप भारतात पाठवणारी व्यक्ती पाकिस्तानमध्ये राहणारी मूळ अफगाणिस्तानची (Afghanistan) नागरिक आहे. या हेरॉईनमागे अफगाण कंपनीचा हात असून, त्यांनी ही खेप दुबईमार्गे पाठवली होती.'

Heroin
Amit Shah Mumbai Tour: गृहमंत्री शाहांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सूरक्षा यत्रंणेचे दूर्लक्ष

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अमली पदार्थ भारतातील (India) विविध ठिकाणी पोहोचवण्यात येणार होते. 6 सप्टेंबर रोजी, स्पेशल सेलने दिल्लीतून अटक केलेल्या दोन अफगाण नागरिकांच्या सांगण्यावरुन चेन्नई बंदरातून भारतात आणलेले 312 किलो मेथॅम्फेटामाइन ड्रग्स देखील जप्त केले होते. आरोपी अफगाण नागरिक मुस्तफा आणि रहीमुल्ला यांनी पोलिसांना (Police) या मालाचा क्लूही दिला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com