Delta Plus Variant In Maharashtra: राज्याला 'डेल्टा प्लस'चा धोका किती?

Delta Plus COVID variant,
Delta Plus COVID variant,

मुंबई: महाराष्ट्र राज्यातील(Maharashtra) सात जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे(Delta Plus ) 21 रुग्ण सापडल्याने काहीसे भीतीचे वातावरण पसरले असून आरोग्यमंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती माध्यमांना दिली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या सर्व रुग्णांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या सर्वांना लवकरच विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. यापाकी काही रुग्ण बरे होवून घरी गेले असून डेल्टा प्लसची लागण अजून तरी एकाही लहान मुलाला झालेली नाही, अशी माहीती राजेश टोपे यांनी दिली.(Delta Plus Variant In Maharashtra Delta Plus causes a decrease in antibodies in the body)

21 रुग्ण आढळल्याने राज्याची चिंता वाढली

महाराष्ट्र राज्यात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळत असतांनाच करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे एकाचवेळी 21 रुग्ण आढळल्याने राज्याची चिंता वाढली आहे. केंद्र सरकारकडून मंगळवारी याबाबत महत्त्वाच्या सूचना राज्याला देण्यात आल्या आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राला सतर्क राहण्यच्या सुचनाही केंद्राने राज्याला दिल्या. त्याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांबाबत राज्यातील सद्यस्थिती मांडली.

शरिरातील अँटिबॉडिज या व्हेरिएंटमुळे कमी होतात

'महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळले आहेत. शरिरातील अँटिबॉडिज या व्हेरिएंटमुळे कमी होतात, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सध्या तरी आम्ही त्या सर्व 21 रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. या रुग्णांची अपडेट माहिती घेतली जात आहे. त्याचबरोबर ट्रॅव्हल हिस्ट्री जाणून घेतानाच त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही केले जात आहे. या 21 रूग्णांपैकी कुणी लस घेतली आहे का, याचीही माहिती घेण्यात येत आहे', असे टोपे यांनी सांगितले. या रूग्णांचे जीनोमिक सीक्वेन्स स्टडी साठी नमुने लॅबमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुदैवाने या व्हेरिएंटची लागण झालेल्यांपैकी कोणाचाही मृत्यू झालेला नाही या आजारातून काही रुग्ण पूर्ण बरे झाले आहे. सांगत असतांना सध्या तरी लहान मुलांना या व्हेरिएंटची लागण झालेली नाही, असे टोपे यांनी सांगितले.

योग्य ती काळजी घेणे गरजेचे

राज्यात डेल्टा प्लसच्या रुग्णांचे प्रमाण अद्याप कमी असले तरी संक्रमणाचा धोका आहे. त्यामुळे सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. प्रत्येक आठवड्याला प्रत्येक जिल्ह्यातून काही नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात येत आहेत. आतापर्यंत 3 हजार 400 नमुने पाठवले गेले असून त्यात 21 रुग्णांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. हे प्रमाण फारच कमी आहे. मात्र तरीही आम्ही पुर्ण खबरदारी घेत आहोत. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नसले तरी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. ती दक्षता घेतली जात असून नव्या व्हेरिएंटबाबतची सर्व माहिती केंद्र सरकारला पाठवण्यात येत आहे, असे आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com