परमबीर सिंग प्रकरणात शरद पवारांच्याच चौकशीची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका

दैनिक गोमंतक
गुरुवार, 25 मार्च 2021

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली होती.

मुंबई :  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली होती. यानंतर परमबीर सिंह यांनी पत्रात केलेले आरोप गंभीर असून या प्रकरणाची चौकशी निवृत्त आयपीएस अधिकारी जुलियो रिबेरो यांच्यामार्फत करण्यात यावी, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. यानंतर आता या प्रकरणी अजून एक याचिका दाखल झाली आहे.  घनश्याम उपाध्याय, जयश्री पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी विविध तीन वेगवेगळ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केल्या आहेत. 

केरळमधील लोक उच्चशिक्षित असल्याने भाजपला मत देत नाहीत : ओ राजगोपाल

जुलियो रिबेरो यांच्यामार्फत चौकशीचा सल्ला देण्यामागे काय कारण काय? 
संबंधित याचिकेत,  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सर्व प्रकरणी निवृत्त आयपीएस अधिकारी जुलियो रिबेरो यांच्यामार्फत चौकशीचा सल्ला देण्यामागे काय कारण होते, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, या भूमिकेमागे शरद पवारांचा हेतू काय होता, असा प्रश्नही उपाध्याय यांनी विचारला आहे. त्याचबरोबर, य सर्व प्रकारणाची चौकशी सीबीआय किंवा ईडीमार्फत करण्याचे आदेश दिले जावेत, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. त्याचबरोबर,  100 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत  या प्रकरणातील सर्व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या संपत्तीवर जप्ती करण्यात यावी अशीही मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.  

Mansukh Hiren Case : सचिन वाझेंना न्यायालयाचा झटका; एनआयए कोठडीत केली वाढ   

100 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा सीबीआय, ईडी सारख्या तपास यंत्रणेद्वारे तपास करण्यात यावा
त्याचबरोबर, मलबार हिल पोलीस ठाण्यात याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोपांबाबत तक्रार दिली होती.  मात्र यासंदर्भात राजकीय दबावापोटी अजूनही गुन्हा दाखल झालेला नसून पोलिसांनीही कोणतीही कारवाई केली नसल्याचे जयश्री पाटील यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, निलंबित पोलिस अधिकारी सचिन वझे आणि या प्रकरणाशी संबंधित इतर इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा.  याचबरोबर या प्रकरणाचा तपास सीबीआय, ईडीसारख्या तपास यंत्रणेद्वारे करण्यात यावा, अशी मागणी जयश्री पाटील यांनी  याचिकेमार्फत दाखल केली आहे. तसेच, परमबीर सिंग यांनी  पत्रात  ज्या दिवसांचा उल्लेख केला आहे, त्या दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले जावेत, अशी मागणी करत जयश्री पाटील यांनी हायकोर्टात  फौजदारी याचिका दाखल केली आहे. 

संबंधित बातम्या