"अन्यथा मागील वर्षासारखा कडक ​लॉकडाऊन लावावा लागेल"

दैनिक गोमंतक
शनिवार, 17 एप्रिल 2021

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होताना दिसते आहे.

मुंबई: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होताना दिसते आहे. सरकारकडून कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. सध्या राज्यात 15 दिवसांसाठी "ब्रेक द चेन" या मोहीमे अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आलेले असून सुद्धा रुग्णसंख्या कमी होत नाही, म्हणून राज्यात येणाऱ्या काळात कडक लॉकडाऊन लागू करण्यात येऊ शकतो असे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  दिले आहे. (Deputy Chief Minister Ajit Pawar made an important statement regarding lockdown)

'येत्या तीन- चार दिवसांमध्ये रेमडीसीविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल...

सुरुवातीला नाईट कर्फ्यू , त्यानंतर अंशतः लॉकडाऊन आणि आता थेट 15 दिवसांची "ब्रेक द चेन" या मोहीमे अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारला घ्यावा लागला आहे. राज्यात वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येसह उपचारासाठी आवश्यक असणारे रेमेडीसीव्हीर इंजेक्शन तसेच ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासतो आहे.   याच पृष्ठभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना हे स्पष्ट केले की, "जर या परिस्थितीमध्ये देखील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले नाही, तर राज्यात मागच्या वर्षी प्रमाण कडक लोकडाऊन लागू करावा लागेल. सध्या सुरु असलेल्या "ब्रेक द चेन" या मोहिमेबद्दलची घसोहन करताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला अनावश्यक गोष्टींसाठी घराबाहेर पडू नका असे सांगितले होते, मात्र तरीही राज्यात बऱ्याच ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचे आढळले असल्याच्चे अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी सांगितले. 

सध्या राज्यात 15 दिवसांसाठी "ब्रेक द चेन"(Break The Chain) ही मोहित लागू करण्यात आलेली असून, त्याअंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांमध्ये सर्वसामान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारकडून अनेक नियम आणि अटी शिथिल ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या परिस्थिती मध्ये देखील महाराष्ट्रात (Maharashtra) काल 63629 नवे रुग्ण सापडले आहेत. तर चिंताजनक बाब म्हणजे राज्यात कोरोना संसर्गामुळे 398 जणांचे मृत्यू झाले आहेत.

 

 

संबंधित बातम्या