डीसी डिझाईनचा संस्थापक डिझायनर छाब्रियाला आर्थिक फसवणूकप्रकरणी अटक

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

डीसी डिझाईनचे संस्थापक-प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया याला 25 कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

मुंबई :  डीसी डिझाईनचे संस्थापक-प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया याला 25 कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. 22 जानेवारीला 25 कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शनिवारी डिझायनर दिलीप छाब्रियाला अटक झाली असून, न्यायालयाने छाब्रियाला याप्रकरणी 5 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. नरिमन पॉईंट परिसरात एक बनावट नंबर प्लेट असलेली स्पोर्टस्‌ कार येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सचिन वझे यांनी सापळा लावला होता. या कारची झडती घेतल्यावर कारवर बनावट नंबर प्लेट असल्याचे निदर्शनास आले. त्याचा चेसी नंबरही बदलल्याचे पोलिसांना आढळले.

कोल्हापूर ते मुंबई प्रवास होणार फक्त सहा तासांत

2016 ते 2018 च्या दरम्यान छाब्रियाने एका ऑटो पार्ट विक्रेत्याकडून कारचे सुटे भाग खरेदी केले होते, परंतु त्याचे पैसे दिले नाहीत, असा छाब्रियाविरोधात आरोप आहे. डिझायनर दिलीप छाब्रिया हा चेन्नई येथील रहिवासी आहे. खरेदी केलेल्या कारच्या सुट्या भागांची किंमत सुमारे 18 कोटी आहे; पण व्याज पकडून ही रक्कम 22 कोटी झाली आहे. पोलिसांनी कार ताब्यात घेत छाब्रियाला अटक केली होती. या कारचे रजिस्ट्रेशन चेन्नईतील असल्याची माहिती मिळाली आहे.

धक्कादायक! लहान मुलांना पोलिओ लस म्हणून देण्यात आले सॅनिटायझर   

याप्रकरणी त्यांचा मुलगा बोनिटो छाब्रिया याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याने या कंपनीचा मालक छाब्रियाविरोधात न्यायालयात तक्रार केली होती. त्याने दिनेश कार्तिकला कार देतो असे सांगत 5 लाख रुपये आगावू घेतले होते. त्याने कॉमेडियन कपिल शर्माचीही साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. छाब्रियाने त्याच्या कंपनीतून 120 स्पोर्टस्‌ कार देश-परदेशात विकल्या आहेत. यातील सरासरी एका कारवर 42 लाख एवढे कर्ज असल्याचे समोर आले. यातील 90 कारमध्ये घोटाळा असून तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या