राज्य सरकारने शरद पवारांची दिशाभूल केली; फडणवीसांचा दावा 

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 23 मार्च 2021

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय वादावरून उद्धव ठाकरे सरकारवर पुन्हा निशाणा साधला.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय वादावरून उद्धव ठाकरे सरकारवर पुन्हा निशाणा साधला. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यसरकारने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. तसेच अनिल देशमुखांना पाठीशी घालण्याचा त्यांचा प्रयत्नही फसला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. अनिल देशमुख क्वारंटाईन नव्हते, 15 ते 27 फेब्रुवारी या क्वारंटाईन च्या काळात ते अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांना भेटले, असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले. 

काल शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख 6 ते 15 फेब्रुवारी या काळात रुग्णालयात होते, असे सांगितले. शिवाय, त्यानंतरही ते अनेक दिवस क्वारंटाईन होते असा दावा शरद पवार यांनी केला होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी केलेले सर्व दावे खोटे असल्याचे म्हटले आहे. तसेच फडणवीस यांनी यावेळी आपल्याकडे एक पत्र असल्याचे सांगितले. व या पत्रसंदर्भात आपण आज दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहसचिवांना भेटणार असल्याचे त्यांनी आज नमूद केले.    

सीबीआय चौकशीसाठी परमबीर सिंग यांची सुप्रीम कोर्टात याचिका

त्याचबरोबर, राज्यात ट्रान्सफर-पोस्टिंग रॅकेट प्रकरणाची देखील सीबीआय मार्फत चौकशी करण्याची विनंती करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर, आपण मुख्यमंत्रीपदी असताना देखील या प्रकरणाची माहिती मिळाली होती. आपल्या सरकारने यावर कडक कारवाई केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यानंतर, आपल्याकडे काही कॉल रेकॉर्डिंग्स आहेत आणि त्यावरून यातील अनेक गोष्टी ठाकरे सरकारला माहित होत्या, हे स्पष्ट होत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितले.    

याव्यतिरिक्त, पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ट्रान्सफर-पोस्टिंग रॅकेट असल्याचा आरोप करत, माजी एसआयटी प्रमुख रश्मी शुक्ला यांनी दिलेला अहवाल आणि ऑडिओ सीडी यावेळी सादर केले. मात्र, राज्यसरकारने हे रॅकेट प्रकरण उघडकीस आणणाऱ्या रश्मी शुक्लांना साईडपोस्टिंगला टाकले असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले. व त्याच्या जागी सुबोध जयस्वाल यांची  प्रतिनियुक्ती करण्यात आल्याचे ते म्हणाले. आणि या सर्व गोष्टी माहिती असताना देखील उद्धव ठाकरे यांनी कारवाई का केली नाही, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. 

संबंधित बातम्या