आजचा बंद म्हणजे ढोंगीपणाचा कळस; देवेंद्र फडणवीसांचं टिकास्त्र

महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यापासून दोन हजारावरुन अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. Maharashtra Bandh
आजचा बंद म्हणजे ढोंगीपणाचा कळस; देवेंद्र फडणवीसांचं टिकास्त्र
Devendra Fadnavis Attacks on Mahavikasaghadi Maharashtra BandhDainik Gomantak

महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यापासून दोन हजारावरुन अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे आम्ही सरकारला राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन करत आहोत. आजचा महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) हा ढोंगीपणाचा कळस आहे, म्हणत महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे. राज्यात आपत्ती आली तर ठाकरे सरकार बळीराजाला मदत करत नाही. या सरकारजवळ थोडी तरी नैतिकता असेल तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करतील. सरकार घोषित हा महाराष्ट्र बंद आहे. राज्यातील जनता या बंदमध्ये सहभागी झालेली नाही. मात्र या तीन्ही पक्षांचे कार्यकर्ते जबरदस्तीने बंदमध्ये सहभागी करत आहेत.

त्याचबरोबर फडणवीसांनी काँगेस राष्ट्रवादी काँगेसच्या काळात झालेल्या मावळ घटनेवरून देखील जोरदार हल्ला चढवला आहे.ज्या शेतकऱ्यांनी मावळचे पाणी मागितले त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. मग त्यांना जालियनवाला बाग दिसत नाही का. असा सवाल करत देवेंद्र फडणवीसांनी चार दिवसांपूर्वी जेव्हा राजस्थानमध्ये शेतकरी आंदोलन करतात आणि ते आंदोलन लाठ्यांनी चिरडले जाते, तेव्हा या महाविकास आघाडी सरकारचे लोक काही बोलत नाहीत. असा हल्ला चढवला आहे. लखीमपूरची घटना दुःखद आहे असे आमचे मत आहे. तेथील सरकार यासाठी कारवाई करत आहे. पण महाविकास आघाडी त्यांच्यासाठी अश्रू ढाळण्याचे नाटक करत आहे. जर त्यांनी खरोखरच शेतकऱ्यांची काळजी घेतली असती तर त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा दिला असता.

Devendra Fadnavis Attacks on Mahavikasaghadi Maharashtra Bandh
बेकायदेशीर महाराष्ट्र बंदची 'सू मोटो' दखल घ्या; न्यायाधीशांना पत्र

आजच्या बंद दरम्यान युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात टायर जाळले. कोल्हापुरातही महामार्गावर उभे राहून शिवसेनकांनी जबरदस्तीने मार्ग अडवला. मुंबईत बेस्टच्या आठ बसची तोडफोड करण्यात आली. पूर्व द्रुतगती मार्गावर शिवसैनिकांनी टायर जाळले. या सर्व हिंसक घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "जेव्हा भाजप शांततेत आंदोलन करते तेव्हा लाठीचार्ज होतो.अशी आठवण देखील करून दिली आहे.

Related Stories

No stories found.