देवेंद्र फडणवीसांचा  मराठा आरक्षणावरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 20 जानेवारी 2021

विरोधी  पक्षनेते  देवेंद्र  फडणवीस यांनी  ठाकरे  सरकारला  धारेवर  धरत , 'सरकार  आरक्षणाच्या  प्रकरणात  काय  करत आहे  हे  लक्षातच  येत  नाही"  असं  खोचक  विधान  केलं.

मुंबई:  मराठा  आरक्षणाची  सुनावणी   सर्वोच्च  न्यायालयाने  पुढे  ढकलल्यानंतर  राज्यातील आघाडी  सरकारवर  विरोधकांनी  निशाणा  साधला. विरोधी  पक्षनेते  देवेंद्र  फडणवीस यांनी  ठाकरे  सरकारला  धारेवर  धरत ,'' सरकार  आरक्षणाच्या  प्रकरणात  काय  करत आहे  हे  लक्षातच  येत  नाही"  असं  खोचक  विधान  केलं.

सर्वोच्च  न्यायालयाने  आरक्षणावरील  सुनावणी  पुढे ढकलल्यानंतर फडणवीसांनी  माध्यमांशी  बोलताना  म्हटले  की,  ठाकरे  सरकार  आरक्षणाच्या  प्रकरणात ज्या  पध्दतीने  घोळ  घालत  आहे,  त्यावरुन  एकंदरीत  सरकारच्या  मनात  काय  चालले आहे  ते  अद्याप  तरी  आंम्हाला   काही  कळत  नाही.  "मराठा  आरक्षणाच्या  प्रकरणवरुन भाजप  नेत्यांचे  समाधान  करण्यापेक्षा  मराठा  समाजाचं  समाधान  करा  तर  आम्ही मानतो", असा टोलाही फडणवीसांनी यावेळी ठाकरे सरकारवर लगावला.

ठाकरे  सरकार  आरक्षणाच्या  संदर्भात  ठाम  भूमिका  घेताना  दिसत  नाही.  प्रत्येक  वेळी आपली  भूमिका  बदलत  आसल्याने  सरकारच्या  या  दोन  भूमिकांमध्ये  सतत  विसंगती पहायला  मिळत  आहे.  सरकारने  आरक्षणासंबंधी  स्थापन  केलेली  राज्य  समिती   मराठा समाजातील  कोणत्या  घटकांशी  वार्तालाप  करते  हे अनभिज्ञचं  आहे, असंही  फडणवीस यावेळी  म्हणाले.      

संबंधित बातम्या