''तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही'', फडणवीसांनी ठाकरे सरकारवर साधला निशाणा
Devendra Fadnavis Dainik Gomantak

''तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही'', फडणवीसांनी ठाकरे सरकारवर साधला निशाणा

महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरातील राजकीय घडामोडी मागील काही दिवसांपासून लाऊडस्पीकर वादाभोवती फेर धरत आहेत.

महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय घडामोडी मागील काही दिवसांपासून लाऊडस्पीकर वादाभोवती फेर धरत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित करत राज्यातील राजकारण हदरवून सोडले. यानंतर राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले. लाऊडस्पीकरच्या मुद्याने महाराष्ट्रासह (Maharashtra) उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशातील राजकारण ढवळून निघालं. यातच आज महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबईतील सोमय्या मैदानावर भव्य सभा पार पडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सरकार चालवण्यात सपशेल अपयशी ठरले असल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले. (Devendra Fadnavis criticized Chief Minister Uddhav Thackeray)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''ज्या छत्रपतींनी महाराष्ट्राला नवी ओळख दिली त्यांना मी अभिवादन करतो. महाराष्ट्र दिवस केवळ साजरा करण्याचा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्याचा दिवस आहे. ज्या महाराष्ट्रात महिला शिक्षणाचा पाया घातला त्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना वंदन करण्याचा आजचा हा दिवस आहे. महाराष्ट्र म्हणजे आठरापगड जातींनी निर्माण केलेला 'प्रदेश' आहे. मात्र काहींना आपणच महाराष्ट्र असल्याचे वाटत आहे. ठाकरे सरकारने अनेक भ्रष्टाचार केले आहेत, त्याची आम्ही आज पोलखोल करत आहोत. मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ठाकरे सरकार घाबरत आहे. त्याचबरोबर बाबरी मशिद पाडण्यामध्ये भाजप अग्रेसर होता. शिवसेना कुठेच नव्हती. तीस वर्षे बाबरी प्रकरणात भाजपच्या नेत्यांनी आपले आयुष्य घालवले.''

Devendra Fadnavis
''बाळासाहेब भोळे होते; मी मात्र भोळा नाही धूर्त आहे''

फडणवीस पुढे म्हणाले, ''उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांनी रामासाठी आपले सरकार कुर्बान केले. आज मात्र महाराष्ट्रात हनुमान चालिसाच्या पठनावरुन राजद्रोहासारख्या गुन्ह्याला सामोरं जावं लागत आहे. राणा दाम्पत्याने असा कोणता गुन्हा केला की, त्यांच्यावर राजद्रोहासारखा गुन्हा या ठाकरे सरकारने लावला. 370 कलम हटवण्याची ताकद केवळ मोदी सरकारमध्ये होते. त्यांनी जम्मू काश्मीरला (Jammu and Kashmir) देण्यात आलेला विशेष दर्जा काढून टाकला. त्यानंतर काही राजकीय पक्षांना मोदी सरकार जबरदस्त टीका केली होती. मोदींच्या कार्यकाळात भारताचा खऱ्या अर्थाने विकास झाला. दुसरीकडे, मोदी सरकारने चीनला देखील रोखले. गलवान खोऱ्यात आपल्या भारतीय जवानांनी चीन सैन्यांना रोखलं. मात्र त्यातही विरोधकांनी मोदी सरकारवर टीका केली.''

Devendra Fadnavis
बाळासाहेब ठाकरे सामान्यांचे आधारस्तंभ होते..!

आशिष शेलार म्हणाले, 'मागील काही दिवसांपासून भाजप राज्यात पोलखोल कार्यक्रम राबतवत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांकडून भाजप आर्थिक लेखाजोखा घेत आहे. मुंबईकरांच्या पैशांचा हिशोब भारतीय जनता पक्ष या सत्ताधाऱ्यांकडे मागत आहे. त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचारांची देखील पोलखोल भारतीय जनता पक्ष करत आहे. येणारा काळ मुंबईकरांच्या विकासाचा असणार आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.