"हिंदू काय रस्त्यावर पडले आहेत का? सरकारला लाज वाटायला हवी"

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

आपल्या पत्रात फडणवीस यांनी लिहिले आहे की, "हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कोणीही येतो आणि इथले वातावरण खराब करतो, हे आम्हाला मान्य नाही. शरजील उस्मानी नावाचा एक व्यक्ती महाराष्ट्रात येऊन हिंदू समाजाचा अपमान करतो हे आश्चर्यकारक आहे

नवी दिल्ली: 30 जानेवारी 2021 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी (एएमयू) चे माजी विद्यार्थांनी शरजील उस्मानी यांने हिंदू समाजा विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. शरजील उस्मानीविरोधात राज्य सरकारने तातडीने कठोर कारवाई केली पाहिजे.'' अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस  यांनी उद्धव ठाकरे यांना केली आहे.

आपल्या पत्रात फडणवीस यांनी लिहिले आहे की, "हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कोणीही येतो आणि इथले वातावरण खराब करतो, हे आम्हाला मान्य नाही. शरजील उस्मानी नावाचा एक व्यक्ती महाराष्ट्रात येऊन हिंदू समाजाचा अपमान करतो हे आश्चर्यकारक आहे आणि राज्य सरकारने अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही." महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 30 जानेवारी 2021 रोजी पुण्यातील एल्गार परिषदेत भाषण करताना शरजील उस्मानी यांनी हिंदू समाजाविरूद्ध काय म्हटले होते ते आपल्या पत्रात नमूद केले आहे. 

शरजील उस्मानी यांने, "हिंदू समाज सडका बनला आहे" असे वक्तव्य केले आहे. यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. फडणविस मुंबईत माध्यमांशी बोलत होते. असा कुठला सडक्या डोक्याचा व्यक्ती महाराष्ट्रात येऊन हिंदूंना सडका म्हणत असेल आणि सरकार त्याच्यावर कारवाई करत नसेल तर भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. हिंदू काय रस्त्यावर पडले आहेत का? या राज्यात काय मोगलाई आहे का? सरकारला लाज वाटायला हवी, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला केला आहे. गृहमंत्री म्हणतात आम्ही चौकशी करु. सगळ समोर असताना, व्हिडीओ व्हायरल होत असताना कसली चौकशी करणार? तात्काळ गुन्हा दाखल करुन त्याला अटक करा, अशी आक्रमक मागणी फडणवीसांनी राज्य सरकारकडे केली आहे.

 

Farmer Protest: कृषी कायद्यांवरुन राज्यसभेत गदारोळ; विरोधी पक्षांनी केला सभात्याग -

संबंधित बातम्या