''महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच''

महाराष्ट्र सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर दुसऱ्याच केले स्पष्ट
Ekanth Shinde & Devendra Fadnavis
Ekanth Shinde & Devendra FadnavisDainik Gomantak

गेले काही दिवस महाराष्ट्रात राजकीय घडामोडी वेगाने घडत होत्या. याला आता पुर्णविराम मिळणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. कारण राज्यात आता शिंदे गट आणि भाजपचे गटबंधन धाल्याने या दोन्ही गटांनी आपले सरकार स्थापित केले आहे. या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. याच मंत्रिमंडळाचा आता विस्तार होणार असल्याचं विधान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. ( Devendra Fadnavis say Maharashtra cabinet expansion of New Government soon )

Ekanth Shinde & Devendra Fadnavis
अमरावती हत्याकांडप्रकरणी पोलीस आयुक्त आरती सिंह यांचा नवा खुलासा

फडणवीस यांचे त्यांच्या मूळ गावी नागपुरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे सांगितले.

Ekanth Shinde & Devendra Fadnavis
महाराष्ट्रातील भागात मुसळधार पाऊस, कोल्हापुरात NDRF च्या दोन तुकड्या तैनात

उल्लेखनीय म्हणजे, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंडखोर भूमिका घेतल्याने महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली कारण बहुतांश आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 30 जून रोजी शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले होते की, त्यांच्या आणि फडणवीस यांच्या खात्यांच्या वाटपाबाबत चर्चा करण्यापूर्वी आपल्याला थोडा वेळ हवा आहे. शिंदे म्हणाले, चला शांततेचा श्वास घेऊ. हा सगळा प्रकार (अलीकडील राजकीय घडामोडी) अतिशय अशांत होता. मी आणि फडणवीस बसून मंत्रिमंडळ आणि खात्यांच्या वाटपाबाबत चर्चा करू. आम्ही भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांशीही बोलू असे ही ते यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com