देवगड तटरक्षक दलाच्या रडारवर चिनी बोटी
चिनी बोटीDainik Gomantak

देवगड तटरक्षक दलाच्या रडारवर चिनी बोटी

देवगड समुद्रातून सागरी तटरक्षक दलाने दोन चीनी बोटी पकडून पोलीसांच्या ताब्यात दिल्या

महाराष्ट्रातील सिंधुदुर्गच्या देवगड तटरक्षक दलाच्या रडारवर चिनी बोटी (Chinese boat) सिंधुदुर्गाच्या सागरी हद्दीत आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक यंत्रणा खडबडून जागी झाली. चिनी मच्छीमारी नौका सिंधुदुर्गच्या सागरी हद्दीत आल्याची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर यंत्रणांनी वेगाने हालचाली करण्यास सुरवात केली. त्यानंतर देवगड समुद्रातून सागरी तटरक्षक दलाने दोन चीनी बोटी पकडून पोलीसांच्या ताब्यात दिल्या.

पोलिसांनी मच्छ विभागाच्या ताब्यात दिल्यानंतर या दोन्ही बोट देवगड बंदरात दाखल झाल्या. मच्छ विभागाने केलेल्या तपासात संबधित मच्छीमारी नौका रत्नागिरीच्या असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या बोटी वरील ‘अ‍ॅटोमेटिक अ‍ॅडिंटीफिकेशन सिस्टिम’ ही चायनीज बनावटीची सिस्टीम असल्याने हा सगळा गोधळ उडाला होती. चिनी बनावटीची सिस्टीम नोंदणीकृत नसल्याने स्थिनिक यंत्रणाचा वेळेवर गोंधळ उडाला. सदर मच्छीमारी नौका देवगड बंदरात आणल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी ही नौका मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.