बलात्कारांच्या आरोपांबद्दल धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुडेंवर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत.

मुंबई :  महाराष्ट्राचे सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुडेंवर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत. मात्र धनंजय मुंडेंनी हे सगळेआरोप फेटाळत फेसबुकद्वारे एक निवेदन जारी केलं आहे. एका महिलेकडून मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याची समाजमाध्यमांवर चर्चा सुरू झली होती.

धनंजय मुंडेंनी फेसबुकद्वारे एक निवेदन जारी केरत खुलासा केला. कालपासून मिडियामध्ये माझ्याबद्दल काही कागदपत्रे प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी एका महिलेने त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये आहे . हे सर्व आरोप खोटे असून, माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहेत, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर मृत कावळे आढळल्याने रत्नागिरीत भीतीचे वातावरण 

"सदर महिलेची बहिण व मी २००३ साला पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही गोष्ट माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

'सदर महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, २०१९ पासून सदर महिला व त्यांची बहीण यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीवाला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता. या बाबत १२ नोव्हेंबर २०२० रोजी मे २०१९ पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे,' अशी माहिती त्यांनी दिली आहे."

 

संबंधित बातम्या