"रेमडेसिविर खरेदी करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची चौकशी झाली पाहिजे "

दैनिक गोमंतक
सोमवार, 19 एप्रिल 2021

ब्रुक फार्माच्या संचालकाला ताब्यात घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते रात्रीच पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते.

मुंबई पोलिसांनी रेमडेसिविर साठेबाजी केल्याच्या संश्यावरून ब्रुक फार्माच्या संचालकाला चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजलेली पाहायला मिळाली आहे. ब्रुक फार्माच्या संचालकाला ताब्यात घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते रात्रीच पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. तर पोलिसांनी फक्त चौकशीसाठी काही लोकांना ताब्यात घेतले असल्याचे सांगितले आहे.( Digvijay Singh has demanded an inquiry into Fadnavis in the Remedesivir purchase case.)

महाराष्ट्रात प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला एका रुग्णाचा मृत्यू!

भारतीय जनता पक्षाचे नेते प्रसाद लाड यांनी १२ एप्रिल रोजी दमण येथील ब्रुक फार्म कंपनीच्या कार्यालयात गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार त्यावेळी ब्रुक फार्माकडून भारतीय जनता पक्षाला ५० हजार इंजेक्शन देण्यात आलेली होती. ही इंजेक्शनस भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रातील रुग्णालयांना दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर पोलिसांनी राजेश डोकनिया या ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकास ताब्यात घेतले. राजेश डोकनिया यांच्याकडून रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठा साथ होता. त्यांना हे इंजेक्शन प्रदेशात विकायचे होते मात्र केंद्र सरकारने निर्यात बंदी घातल्याने तो साथ पडून होता असे पोलिसांकडून सांगण्यात येते आहे. 

दरम्यान, या प्रकरणानंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. ४.५ कोटी रुपयांचे रेमेडीवीर इंजेक्शन खरेदी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची चौकशी व्हावी अशी मागणी दिग्विजय सिंग यांनी यावेळी केली आहे. 

संबंधित बातम्या