राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन सुरु चर्चेला शिवसेनेकडून पूर्णविराम

शिवसेनेकडून संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी नाहीच
Sanjay Raut
Sanjay RautDainik Gomantak

गेले तीन ते चार दिवस महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना वेग आला होता. शिवसेना संभाजीराजेंना झुकते माप देणार का ? अथवा आपला उमेदवार देणार या चर्चांना वेग आला होता. पण शिवसेनेने या मुद्यांना आता पुर्णविराम दिला आहे. कारण शिवसेनेने राज्यसभेसाठी अखेर संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. मात्र अद्याप अधिकृत घोषणा करणं बाकी आहे.

Sanjay Raut
मालवणमध्ये पर्यटकांची बोट बुडाली; दोघांचा मृत्यू, दोघांची स्थिती गंभीर

यावेळी खासदार संजय राऊत यांनी मावळे असल्यानेच राजे असतात असं सांगत अप्रत्यक्षपणे संभाजीराजेंना टोलाही लगावला. शिवसेनेने दुसऱ्या जागेसाठी ही नाव ठरवलं असल्याची माहिती दिली आहे. तसेच संजय पवार यांचं नाव अंतिम झालं आहे. संजय पवार शिवसेनेचे मावळे असून उद्धव ठाकरेंनी या मावळ्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल,” असं राऊत यांनी सांगितलं.

दोन्ही जागांवर शिवसेना लढेल आणि उमेदवार विजयी होतील

राज्यसभेच्या दोन जागांसाठी शिवसेनेने आपली नावे ठरवली आहेत. यापैकी एक कोल्हापूरचे संजय पवार आहेत. पवार हे अनेक वर्ष जिल्हाप्रमुख आहेत, कडवट शिवसैनिक आहेत. ते पक्के मावळे असून मावळे असतात म्हणून राजे असतात. पक्षनेते, पदाधिकारी हे मावळ्यांच्या जोरावर उभे असतात,” असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

Sanjay Raut
राज्य परिचारिका संघटनेचा बेमुदत संपाचा इशारा

संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांशी आपलं बोलणं झालं असून आदर ठेवला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “नक्कीच सन्मान ठेवत आहोत. त्यांच्या कुटुंबाविषयी, गादीविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कायम आदर आहे. राजेंना राज्यसभेवर जायचं आहे, अपक्ष लढायचं आहे आणि त्यासाठी ४२ मतांची गरज आहे. संभाजीराजे अपक्ष लढणार असतील तर त्यांच्याकडे मतांची काय योजना आहे माहिती नाही. असं ही ते यावेळी म्हणाले.

संभाजीराजेंच्या समर्थकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “आम्ही कोणाच्या प्रश्नांना उत्तर देण्यास बांधील नाही. त्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती नसावा. एकनाथ ठाकूर हे कडवट शिवसैनिक होते. ज्या सामनाच्या इमारतीखाली आपण बोलत आहोत. त्यातही त्यांचा वाटा होता. प्रियंका चतुर्वेदीदेखील शिवसेनेच्याच उमेदवार आहेत. प्रितीश नंदी हेदेखील शिवसेनेचे उमेदवार होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com