डिसले गुरुजींचा पुन्हा एकदा 'ग्लोबल सन्मान'

ranjit guruji.jpg
ranjit guruji.jpg

भारतातील पहिले ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teacher Award) मिळवणारे रणजितसिंह डिसले (Ranjit Disley) यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. डिसले गुरुजी यांची जागतिक बॅंकेने (World Bank) सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. 

रणजितसिंह डिसले गुरुजींची जून 2021 ते 2024 अशा तीन वर्षांच्या कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी जागतिक बॅंकेने 'ग्लोबल कोच' (Global Coach) नावाचा नवा कार्यक्रम हाती घेतला आहे. जगातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणण्यासाठी मदत करणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे अशी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहे. ही उद्दीष्टे संपादन करण्यासाठी जगातील 12 व्यक्तींची सल्लागार म्हणून निवड केली आहे.  (Disley Guruji once again awarded Global Honor)

लंडनस्थित वार्की फाउंडेशन (Warkey Foundation) आणि युनेस्को (UNESCO) यांच्या विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर' हा सात कोटी रुपयांचा पुरस्कार सोलापूरमधील परितेवाडीमधील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना प्रदान करण्यात आला आहे. लंडन येथील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये (Museum of Natural History) पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये प्रसिध्द अभिनेता स्टिफन फ्राय (Stephen Fry) यांनी या संबंधीची घोषणा केली होती. अशा प्रकारचा पुरस्कार मिळवणारे रणजितसिंह डिसले हे पहिले भारतामधील शिक्षक ठरले आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा चांगलीच रंगली होती.

'ग्लोबल टीचर प्राइझ' पुरस्कार (Global Teacher Prize) हा शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखला जाते. दहा लाख डॉलर असं त्या पुरस्काराचे स्वरुप आहे. सोलापूरमधील(Solapur) जिल्हा परिषदेच्या परितेवाडी शाळेमध्ये मागील अकरा वर्षापासून डिसले गुरुजी हे शैक्षणिक तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगामुळे जगभर ओळखले जातात. त्यांनी तयार केलेल्या 'क्यूआर कोड' (QR code)या पध्दतीनुसार तयार केलेली शैक्षणिक पाठ्यपुस्तके सध्या अकरा देशातील दहा कोटींपेक्षा जास्त मुले वापरत आहेत. 'व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप' या आगळ्यावेगळ्या अध्यापन पध्दतीच्या माध्यामातून रणजितसिंह डिसले गुरुजी  दिडशेपेक्षा जास्त शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com